*पैठण मतदार संघातील वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न मिटणार : ना. संदीपान भुमरे* *पंढरीत संत एकनाथ महाराज भक्त निवासचे भूमिपूजन

*पैठण मतदार संघातील वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न मिटणार : ना. संदीपान भुमरे*  *पंढरीत संत एकनाथ महाराज भक्त निवासचे भूमिपूजन

पंढरपूर/प्रतिनीधी

आपण ज्या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या पैठण मतदार संघातील वारकरी भाविकांना पंढरपूर येथे आल्यानंतर निवासाची सोय नव्हती. ती हककाची सोय अवघ्या दोन वर्षात पूर्ण करून दाखवणार असल्याची ग्वाही राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री ना. संदीपान भूमरे यांनी दिली आहे.


पंढरपूर येथे ६५एकर परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या संत एकनाथ भवन व संत एकनाथ पादुका मंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी मंत्री ना भुमरे आले होते.  यावेळी ते बोलत होते.यावेळी विधानसभेचे माजी सभापती हरीभाऊ बागडे, ह भ प महंत भास्करगिरी महाराज, ह भ प प्रकाश महाराज बोधले, मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे,शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे,मोहोळ विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश पारवे, उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उकामांत करंडे,पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुमरे म्हणाले की, संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांना सकाळी उठलं की हे सरकार दिसत.त्यामुळे ते भविष्यकार झाले आहेत. ते नेहमी सरकार पाडण्याच्या गोष्टी करतात.आम्ही सर्व कायदेशीर बाबी  पूर्ण करुनच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार अपात्र ठरणार नाहीत. मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळेल. मागासवर्गीय आयोग व सरकार काम करत आहे.ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल, त्या दृष्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे काम करत  असल्याचेही ना. भुमरे यांनी सांगितले. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याबाबत विचारले असता. मंत्रिमंडळ विस्तार थांबला असला तरी राज्यातील विकास मात्र झपाट्याने सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी भाटूबरे गावचे सरपंच मंडाबाई भारत ढवळे, भाळवणीचे सरपंच राजकुमार पाटील, बेगमपुरचे सरपंच प्रकाश सपाटे, हराळवाडीचे सरपंच लींगराज व्हंनमाने,गोपाळपूरचे उपसरपंच आरुण बनसोडे, आंबे गावचे सरपंच प्रकाश माळी, संजय मस्के,
आर पी आयचे  विजय खरे, समाधान बाबर, सोनू शिंदे,लखन वाघमारे, सतीश जाधव ,आकाश फडतरे, सुभाष बनसोडे,सिद्धार्थ लोखंडे,अमर सोनवणे , निखिल गायकवाड, पांडुरंग डोंगरे, नोमिनाथ शिरसट, अतिश सावंत, विकास सावंत, राजेंद्र चंदनशिवे सर, समर्थ साठे यांच्यासह मोहोळ विधानसभा मतदार संघातील विविध गावचे सरपंच आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

*ना. भूमरे यांचे  राजाभाऊ खरे यांचे जंगी स्वागत*

राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. संदीपान भूमरे हे पंढरीत दाखल होताच, मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांनी जंगी स्वागत केले.
 ना.भूमरे आणि उद्योजक राजू खरे यांचे १९९५पासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत . त्यामुळे ज्या ज्या वेळी ना. भूमरे हे पंढरीत येत असतात. त्या त्या वेळी खरे यांच्या वतीने जंगी स्वागत होत असते. दोघामधील जिव्हाळ्याचे असलेले संबंध पाहता. भूमिपूजन समारंभ वेळीही ना भूमरे यांचेकडूनही खरे यांना फारच मोठी प्रेमाची वागणूक दिल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असलेल्या आमदार मधून राजाभाऊ खरे हे एक असून त्यांच्यासाठी जे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यातील ना. भूमरे सुद्धा महत्वाची भूमिका निभावत असल्याचेही खरे यांनी सांगितले .