*स्वामी समर्थ शिक्षण मंडळाचे कार्यवाह खंडागळे यांचा वाढदिवस साजरा* *प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये केला साजरा*

*स्वामी समर्थ शिक्षण मंडळाचे कार्यवाह खंडागळे यांचा वाढदिवस साजरा*  *प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये केला साजरा*

पंढरपूर/प्रतिनीधी 

श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह जितेंद्र खंडागळे  यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
       यावेळी संस्थेचे अध्यक्षा सुवर्णाताई खंडागळे  संस्थेचे सचिव  संकेत खंडागळे  उपस्थित होते. या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशालेतील इयत्ता सहावी  मधील  विद्यार्थिनी कुमारी तयबा आतार ,  इयत्ता सहावीतील कु. श्रुतिका यादव हिने ही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले.यानंतर  प्रशालेचे प्राचार्य प्रशांत पाटील सर यांच्या शुभहस्ते जितेंद्र खंडागळे साहेब यांचा यांचा पुष्पगुच्छ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला .तसे प्रशालेच्या वतीने जितेंद्र खंडागळे साहेब यांना यांना उदंड आयुष्याच्या अनंत आणि शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या .यावेळेस स्वामी समर्थ शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संतोष गायकवाड सर यांनी केले .आभार प्रदर्शन सौ संपदा पिंपळनेरकर यांनी केलं .संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.