*लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा ठेवले शरीर संबंध* *उपरी येथील तरुणाविरुद्ध दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल*

*लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा ठेवले शरीर संबंध*  *उपरी येथील तरुणाविरुद्ध दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल*

पंढरपूर/प्रतिनीधी

पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील कॉलेज युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते. अचानक गावातीलच असलेल्या युवकाने लग्नास नकार दिला. एवढ्यावरच थांबला नसून घडला प्रकार कोणास सांगू नको. असे म्हणत शिवीगाळ आणि धमकीही दिली. यामुळे फसगत झालेल्या युवतीने आपल्याच गावातील त्या युवका विरोधात दहिवडी जिल्हा सातारा पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असता गुन्हा दखल करण्यात आला आहे.
    याबाबत रीतसर गुन्हा दाखल झाला असून, सविस्तर हकीगत पुढीलप्रमाणे आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील कॉलेज  युवती २०२२ पासून सातारा येथील महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागात
शिकत होती. डिसेंबर 2023मध्ये सुट्या असल्याने ही मुलगी उपरी येथे आपल्या गावी आली होती. यावेळी गावातीलच आणि नात्यातीलच असलेले माऊली साहेबराव नागने यांची मैत्री झाली.
  आपल्या सुट्टी नंतर मुलगी 17जानेवारी 2024रोजी सातारा येथे कॉलेजवर गेली होती.त्यानंतर यातील आरोपी युवक याने त्या मुलीचा पिच्छा पूरविण्यासाठी दहीवडीत जाऊन बोलवून घेतले. त्याठिकाणी लग्नाचे आमिष दाखवीत आर्या लॉज वरती शारीरिक संबंध केले. त्यानंतर एकदा परत त्याच ठिकाणी बोलवून शारीरिक संबंध केले.
    यानंतर 5मार्च रोजी माऊली नागने याने म्हसवड येथील लॉजवर बोलवून शारीरिक संबंध केले. त्यावेळी लग्नाबाबत विचारले असता थेट नकार दिला. नकार देऊन या घडल्या प्रकाराबद्दल कोणालाही बोलू नको असे धमकावत शिवीगाळ केली. यानंतर यातील फिर्यादी कॉलेज युवतीने घडला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. त्यामुळे वरील घटनेबाबत दहिवडी पोलिसात तक्रार दिली असता माऊली साहेबराव नागने (उपरी ता पंढरपूर) यांचेविरुढ विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सदर घटनेतील आरोपी हा विठ्ठल सह साखर कारखान्याचे संचालक यांचा मुलगा आहे. गावातील मुलगा आणि गावातील मुलगी यामुळे मागील आठवड्यापासून याबाबतची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.