*पंढरपूर तालुक्यात अतोनात नुकसान* *मान्सूनपूर्व झालेल्या वादळी वाऱ्यातील पावसाचा कोट्यावधी रुपयाचा फटका* *९१ गावातील पिके,घरे अन् जनावरांचे नुकसान*
पंढरपूर/प्रतिनीधी
मान्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे पंढरपूर तालुक्यात झालेल्या नुकसानीची महसूल विभागाकडून नजर अंदाज माहिती जमा केली आहे. यामध्ये ९१गावातून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या झालेल्या नुकसानी मधून प्रचंड वादळी वाऱ्यामुळे अनेक घरे पडली आहेत. दुष्काळी परिस्थितीतही जतन केलेल्या फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तर वीज पडून एक मयत आणि जखमी झाले आहे. जनावरेही मयत आणि जखमी आहेत.
रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसात ९१गावातून जवळपास १५२२शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. यामधून ११०१.२५हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
या झालेल्या नुकसानीमधून २८७ घरांचे नुकसान, तर १६८ घरे पूर्ण जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले आहे. विजेचे खांब पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वीज पडून नुकसानी मधून एक व्यक्ती मयत तर दोन पशुधन मयत झाल्याच्या घटना पंढरपूर तालुक्यात घडल्या आहे. याबाबत लवकरात शासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी पंढरपूर महसूल विभागाचे वतीने युद्ध पातळीवर काम सुर झाले आहे.