*करकंब आदर्श प्रशालेच्या तेजश्री व तृप्ती नागणे या जुळ्या बहिणी समान गुण घेत प्रथम* *९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला*

*करकंब आदर्श प्रशालेच्या तेजश्री व तृप्ती नागणे या जुळ्या बहिणी समान गुण घेत प्रथम*  *९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला*

पंढरपूर /प्रतिनिधी
येथील आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज करकंबमधील एस.एस.सी. परीक्षेत तेजश्री व तृप्ती सुरेश नागणे या जुळ्या बहिणीनी (93टक्के) समान गुण घेत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.

आदर्श प्रशालेचा निकाल 98.78टक्के लागला असून प्रशालेत प्रथम क्रमांक कुमारी तेजश्री सुरेश नागणे 93 टक्के व कुमारी तृप्ती सुरेश नागणे 93 टक्के, द्वितीय क्रमांक सुमित पांडुरंग मराळ 92.80 टक्के, तृतीय क्रमांक गायत्री रमेश जव्हेरी 92 टक्के, चतुर्थ क्रमांक विभागून स्वप्निल संतोष गुळमे 91.40 टक्के व मांजरे राजनंदिनी विश्वनाथ 91.40टक्के गुण मिळविले,
प्रशालेतील परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी 82 विद्यार्थ्यांपैकी विशेष योग्यता प्राप्त 31 व
प्रथम श्रेणी प्राप्त 31तर द्वितीय श्रेणी प्राप्त 19 आले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा जि सदस्य बाळासाहेब देशमुख, संस्थेचे अध्यक्ष रामदास शेटे संस्थेचे सचिव पांडुरंग व्यवहारे,   प्राचार्या विजय उंडे  तसेच संस्थेचे संचालक मंडळ व सर्व  शिक्षक शिक्षकेतर यांनी  अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.