*गरिबांच्या प्रश्नासाठी छावा क्रांतिवीर सेना आक्रमक*   *भंडीशेगाव येथील डोंबारी समाजातील लोकांना बेसुमार वीजबिले* * महावितरण विभागाकडे न्याय देण्यासाठी निवेदन सादर*

*गरिबांच्या प्रश्नासाठी छावा क्रांतिवीर सेना आक्रमक*   *भंडीशेगाव येथील डोंबारी समाजातील लोकांना बेसुमार वीजबिले* *  महावितरण विभागाकडे न्याय देण्यासाठी निवेदन सादर*

पंढरपूर /प्रतिनिधी 

 पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील भटक्या विमुक्त समाजापैकी डोंबारी समाज असलेला गरीब समाज  वास्तव्यात आहे.त्यांच्या गोरगरीब घरासाठी अचानक डीसुमार वीज बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे हा गरीब समाज घाबरून गेला आहे. याची गंभीर दखल छावा क्रांतिवीर सेनेने घेतली आहे. त्या गोरगरीब  समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महावितरण कंपनीकडे निवेदन सादर केले आहे.

 या डोंबारी समाजातील  लोकांकडे रीतसर महावितरणचे घरगुती वीज कनेक्शन आहेत. त्यांना मार्च 2024 पर्यंत 400 ते 1000 च्या दरम्यान वीज बिल येत होते.मात्र एप्रिल 2024 नंतर महावितरण कडून विज बिल काही लोकांना 5हजारापासून ते 35हजार रुपयापर्यंत आलेले आहे. मीटर दुरुस्त करून वीज बिल कमी करून भटक्यां विमुक्त समाजाच्या लोकांना न्याय द्यावा. अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महावितरण विभागाला देण्यात आला आहे. 
            यावेळी छावा क्रांतिवीर    सेनेचे प्रदेश सहसंपर्क प्रमुख गणेश माने,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले, भंडीशेगाव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष माने सर, विजय गाजरे महाराज, संतोष गावडे, दिलीप शिंदे., धर्मा पवार., भाऊसाहेब शिंदे,. चंद्रकांत शिंदे., संजय शिंदे.,राजू पवार., बापू शिंदे,. अजय शिंदे., अंकुश शिंदे., युवराज शिंदे,. बाळू शिंदे,. रवी शिंदे,. रमेश शिंदे., दिलीप शिंदे., उपस्थित होते.