*पंढरीतील आरोग्य विभागाच्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री झाले आक्रमक*   *कार्यक्रम पत्रिकेतील अनुपस्थित पदाधिकाऱ्यांचा केला जाहीर निषेध*  *परिचारक यांचे नाव नसल्याने समर्थकाकडून यांनीही केला कार्यक्रमाचाच निषेध*

*पंढरीतील आरोग्य विभागाच्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री झाले आक्रमक*    *कार्यक्रम पत्रिकेतील अनुपस्थित पदाधिकाऱ्यांचा केला जाहीर निषेध*   *परिचारक यांचे नाव नसल्याने समर्थकाकडून यांनीही केला कार्यक्रमाचाच निषेध*

 पंढरपूर /प्रतिनिधी 

 महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने पंढरीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी भलतेच घडले.यामुळे चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागला आहे.

   सोमवारी झालेल्या या भूमिपूजन समारंभाचे वेळी आरोग्य विभागाच्या वतीने निमंत्रित करण्यात येणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये, सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांचे सह सर्व खासदार आणि आमदारांचा समावेश करण्यात आला होता. निमंत्रित पत्रिकेमध्ये नाव असतानाही पत्रिकेमधील एकही लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले नव्हते. अशातच पंचायत समितीचे उपसभापती आणि परिचारक यांचे समर्थक प्रशांत देशमुख यांना कार्यक्रम प्रसंगी पहिल्यांदाच बोलण्याची संधी दिली होती. पहिल्याच भाषणात त्यांनी  आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या गैरसोयीबद्दल आरोग्य मंत्र्यासमोरच पाढा वाचला. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक त्यांचे नाव निमंत्रित पत्रिकेत नमूद केले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या नाराजीचे रूपांतर कार्यक्रमाचा निषेध करण्यापर्यंत गेली. यामुळे या कार्यक्रमांमध्ये शांतता पसरली होती.
    प्रशांत देशमुख यांचे भाषण आटोपते घेण्याअगोदरच, सूत्रसंचालकाकडून नाव पुकारले नसतानाही, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत हे खुर्चीवरून ताड केला उठले. स्वतःहून माईकचा ताबा हातात घेतला. सुरुवातीलाच त्यांनी भाषणात आक्रमक भूमिका घेतली. नामदार सावंत यांचे कडूनही सदरच्या कार्यक्रमाची रूपरेषा ही माझ्याकडे नसून जिल्हा प्रशासनाकडे होती. असा खुलासा केला. हा शासनाचा  चांगला कार्यक्रम आहे. यासाठी निमंत्रणाची गरजच काय. तेवढ्यावरच न थांबता ना. सावंत यांनी चक्क कार्यक्रम पत्रिकेमध्ये च्या लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. जे लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी आले नाहीत. आक्रमक होत त्यांचा आपण जाहीर निषेध करत असल्याचेही ठणकावून सांगितले. यामुळे या कार्यक्रमांमध्ये विस्कळीतपणा येऊन, केवळ निषेध आणि निषेध यावरतीच कार्यक्रम गुंडाळण्यात आला.
   आपल्या आक्रमक भाषणात ना. सावंत यांनी हा कार्यक्रम माझे कुटुंबातील खाजगी नाही. त्यामुळे मी त्यांना कोणाला निमंत्रण देण्यासाठी जाण्याची गरजच काय? असा प्रश्नही ना.सावंत यांनी यावेळी केला.
    आपल्याकडे आरोग्य खाते आल्यापासून  गोरगरीब जनतेची सेवा उत्तम रीतीने चालू आहे. पंढरीत नेहमीच आरोग्य सेवेसाठी गर्दी असते. हा विचार करीत आपण याठिकाणी लवकरच 1हजार बेडचे सुसज्ज हॉस्पिटल करण्याचा मानस आहे.आगामी अधिवेशन काळात आपण प्रत्येकाला आरोग्य सेवेचा अधिकार मिळावा यासाठी कायदाच करून घेणार असल्याचे सांगत, आरोग्य कर्मचारी आणि सेविका यांनी कोरोना काळात दाखविलेले धाडस आम्ही कदापि विसरणार नाही. प्रत्येक प्रश्न आपण मार्गी लावणार असल्याचे आवर्जून सांगत असल्याचे ना. सावंत यांनी जाहीर केले.
     या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


चौकट 

*आमच्या भैरवनाथ उद्योग समूहाची भागीदारी* 

पंढरीत मागील आषाढी वारीत 'आरोग्याची वारी पंढरीचे दारी '! या उपक्रमातून शासनाचे वतीने आरोग्य महाशिबीर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये साडेअकरा लाख  भाविकांनी उपचाराचा लाभ घेतला होता. मागील वर्षी झालेल्या शिबिरामधील त्रुटी  दूर करीत, यंदाच्या आषाढी वारीतही वाखरी,गोपाळपूर, तीन रस्ता आणि 65एकर परिसरात हे महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. मागील वर्षी पेक्षाही यंदा जास्तीचे उपचार देण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री ना. तानाजीराव सावंत यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
   या घेण्यात आलेल्या आरोग्य महा शिबिराचे वेळी, राज्य शासनाने जेवढा निधी उपलब्ध केला होता. एवढाच निधी  माझ्या वैयक्तिक असलेल्या भैरवनाथ उद्योग समूहाने घातला आहे. त्यामुळे झालेल्या खर्चबाबत कोणाला संशय असेल तर माहिती अधिकारातून माहिती घ्यावी असेही ना. सावंत यांनी सांगितले.