*नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे वतीने वृक्षारोपण*  *पंढरपूर परिसरात विविध भागात 990 रोपांची लागवड

*नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे वतीने वृक्षारोपण*   *पंढरपूर परिसरात विविध भागात 990 रोपांची लागवड

पंढरपूर /प्रतिनिधी 

महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर परिसरातील विविध भागात तब्बल 990 रोपांचे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम पार पडला.

 पंढरपूर येथील विविध भागात रविवारी “महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड प्रतिष्ठान मार्फत पद्मश्री मा. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार पंढरपूर शहर व परिसरात पुढील ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले . यामध्ये रेल्वे मैदान ८० झाडे, पंत चौक वाखारी ते बायपास रोड ८०० झाडे, वाहनतळ इसबावी ११० झाडे, असे एकूण वृक्षारोपण करण्यात आले.

                सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी पंढरपूर नगरपालिका प्रशांत जाधव ; रेल्वे अभियंता राहुल तांदळे ; पंढरपूर नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर ; उपभियांता बांधकाम विभाग भिमाशंकर मेटकरी उपस्थित होते . यावेळी २१०० सदस्यानी सहभाग घेतला होता.