*काळे समर्थक प्रमुख नेत्याचे आ. समाधान आवताडे यानाही साकडे!* *चेअरमन कल्याणराव काळे यांच्या आमदारकीसाठी  गाड्यांचा ताफा मंगळवेढ्यात*

*काळे समर्थक प्रमुख नेत्याचे आ. समाधान आवताडे यानाही साकडे!*  *चेअरमन कल्याणराव काळे यांच्या आमदारकीसाठी  गाड्यांचा ताफा मंगळवेढ्यात*

पंढरपूर /प्रतिनिधी 

 राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती लवकरच होणार आहेत. यामधून पंढरपूर तालुक्याचे दिग्गज नेते चेअरमन कल्याणराव काळे  यांची या आमदारकीसाठी महायुतीतून   शिफारस करण्यात यावी. या मागणीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील 22 गावातून काळे समर्थक प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी सकाळी आ. समाधान आवताडे  यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयामध्ये येऊन  भेट घेतली आहे.
   पंढरपूर तालुक्याचे चार विधानसभा मतदारसंघांमध्ये विभाजन झाले आहे. या चारही मतदारसंघांमध्ये चेअरमन कल्याणराव काळे समर्थकांची मोठी संख्या आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चारही आमदारांना काळे समर्थक मतदारांचा फायदा होणार आहे. यामुळे काळे समर्थक यांनी आमदार समाधान आवताडे यांना  शिफारस करण्याबाबत विनंती केली आहे. यासाठी पंढरपूर तालुक्यातून मोठ्या वाहनांचा टाका मंगळवेढा दाखल झाला होता. आलेल्या नेत्यांनी केलेल्या मागणीची  आपण दखल घेऊन, वरिष्ठांपर्यंत आपली शिफारस करणार असल्याचेआ.अवताडे यांनी आलेल्या नेत्यांना सांगितले आहे.
  मागील दोन दिवसांपूर्वी सांगोला पंढरपूर मतदार संघातील गावामधील काळे समर्थक नेत्यांनी, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचीही भेट घेतली होती. अशाच प्रकारची भेट मोहोळ मतदारसंघातील गावातील समर्थक नेते शनिवारी  आ. यशवंत माने यांची घेणार आहेत. त्यानंतर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचेकडे ही 42 गावातील प्रमुख नेते मंडळी जाऊन भेट घेणार आहेत.
  वरील चारही आमदारांच्या भेटीनंतर वरिष्ठ नेते मंडळींना जाऊन चेअरमन कल्याणराव काळे यांच्या आमदारकीसाठी  शिफारस करणार आहेत. या आमदारांनी केलेल्या शिफारशीचा लाभही काळे समर्थकाकडून मोठ्या प्रमाणात मिळणार आहे  हे मात्र नक्की.

 सहकार शिरोमणी चे व्हा.चेअरमन भारत कोळेकर यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, सहकार शिरोमणी चे संचालक मोहन नागटिळक, तानाजी सरदार,जयनाना देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षाराणी शिंदे, सहकार शिरोमणी चे माजी संचालक महादेव देठे,तानाजी जाधव, कोर्टी गाव चे उपसरपंच महेश येडगे, जोतीराम पोरे,महादेव सुर्यवंशी, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग मोरे, रामभाऊ बागल, विक्रम बागल,प्रदीप बागल, शिवाजी जाधव,अनिल नाना नागटिळक, सोमनाथ पोरे, बजरंग देठे, सहकार शिरोमणी चे व्हा.चेअरमन भारत कोळेकर यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, सहकार शिरोमणी चे संचालक मोहन नागटिळक, तानाजी सरदार,जयनाना देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षाराणी शिंदे, सहकार शिरोमणी चे माजी संचालक महादेव देठे,तानाजी जाधव, कोर्टी गाव चे उपसरपंच महेश येडगे, जोतीराम पोरे,महादेव सुर्यवंशी, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग मोरे, रामभाऊ बागल, विक्रम बागल,प्रदीप बागल, शिवाजी जाधव,अनिल नाना नागटिळक, सोमनाथ पोरे, बजरंग देठे व विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.