*राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 164 प्रकरणे निकाली*  *6 कोटी 18 लाख 80 हजार रुपयांची तडजोड शुल्क वसूल*    

*राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 164 प्रकरणे निकाली*  *6 कोटी 18 लाख 80 हजार रुपयांची तडजोड शुल्क वसूल*    


  
            पंढरपूर /प्रतिनिधी 

 तालुका विधी सेवा समितीच्यावतीने  जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे  दि.27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 164 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण 6 कोटी 18 लाख 80 हजार 654 रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती  तालुका विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष तथा  जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. देसाई यांनी दिली.
        सदर लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित 19 हजार 989 प्रकरणांपैकी 138  प्रकरणे निकाली काढण्यात आली त्यामध्ये 5 कोटी 70 लाख 98 हजाराची वसुली झाली तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकुण 3 हजार 980  प्रकरणे ठेवण्यात आलेली होती त्यापैकी 26 प्रकरणांमध्ये 47 लाख  82 हजारांची वसुली करण्यात आली.
          या लोकअदालतीसाठी एकुण 5 पॅनलची व 1 नियमित न्यायालयाचे व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये  जिल्हा न्यायाधीश एस बी देसाई, न्यायाधीश ए. ए. खंडाळे,  न्यायाधीश एस एस चोपडा, न्यायाधीश श्रीमती के जे खोमणे, न्यायाधीश श्रीमती पी बी घोरपडे,  व नियमित न्यायालयासाठी  न्यायाधीश  ए एस सोनवकर  यांनी काम पाहिले.
   सदरच्या लोक अदालतीमध्ये न्यायाधीश एस एस चोपडा यांनी तब्बल 32 वर्ष जुने असलेल्या दिवाणी प्रकरणात यशस्वीरित्या तडजोड घडवून प्रकरण निकाली काढले. 
             सदरची लोकअदालत  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. त्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे, न्यायाधीश श्रीमती एस. एस पाखले यांनी वेळोवेळी बैठका घेवुन, पाठपुरावा करुन संपन्न केली.
  या लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.
000000