*राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची नागेशदादा फाटे यांच्या कार्यालयास भेट* *उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने करण्यात आले स्वागत*

पंढरपूर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस रविंद्र पाटील व युवक प्रदेश संघटक ॲड.पवन गायकवाड यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचे जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी सर्वांचे स्वागत करत सत्कार केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नागेशदादा फाटे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते येत असतात. यावेळी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येत असते. ही परंपरा प्रदेशाध्यक्ष नागेश दादा पाटील यांनी कायम सुरू ठेवली आहे. त्याच धर्तीवर वरील नेत्यांचेही स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीपदादा मांडवे, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष सागर पडवळ, मोहोळ युवक तालुकाध्यक्ष ॲड.विठोबा पुजारी, सामाजिक न्याय विभाग मोहोळ तालुकाध्यक्ष मनोज गायकवाड इ. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह डाॅ.रमेश फाटे आदी मान्यवर उपस्थित होते.