*लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे वतीने विविध कार्यक्रम*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे वतीने
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान व उमा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने लक्ष्मी टाकळी हद्दीमधील नवीन तयार करण्यात आलेला यमाई तलाव यावर वृक्षारोपण करण्यात आले.
शिवसेना सोलापूर लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुख महेशनाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली वरील कार्यक्रम घेण्यात आला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी युटोपियन शुगरचे चेअरमन उमेशराव परिचारक यांचेसह
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच संजय साठे,उपसरपंच सागर सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सौ रोहिणी महेश साठे, सौ रेश्मा संजय साठे, नागरबाई देविदास साठे, तसेच ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, नंदकुमार वाघमारे, विजयमला वाळके, महादेव पवार, आशाबाई देवकते, समाधान देठे, गोवर्धन देठे,शितल कांबळे, रूपाली कारंडे, तसेच ग्रामसेवक जयंतकुमार खंडागळे, विलास देठे सर,मुलानी सर, सचिन वाळके, सागर कारंडे, विकास देवकते, माजी सरपंच बापूसाहेब कदम, आबासाहेब पवार, मारुती उकर्डे, भीष्माचार्य खपले, बापू उकिरडे, उमा कॉलेजचे कांबळे सर, खिलारे मॅडम, विद्यार्थी वर्ग व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान लक्ष्मी टाकळी यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव,सर्व कार्यकर्ते व टाकळी ग्रामपंचायत ते सर्व कर्मचारी कामगार व इत्यादी नागरिक यावेळी उपस्थित.