*तुतारीच्या हवेने अनिल सावंत यांची उमेदवारी मोठया चर्चेत* *गावभेट दौरे आणि पंढरपूर शहरातील पदयात्रेला मतदारांकडून प्रतिसाद

*तुतारीच्या हवेने अनिल सावंत यांची उमेदवारी मोठया चर्चेत*  *गावभेट दौरे आणि पंढरपूर शहरातील पदयात्रेला मतदारांकडून प्रतिसाद

पंढरपूर /प्रतिनिधी 

सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे  महाराष्ट्रभर घुमत आहे. अशातच प्रत्येक उमेदवाराची प्रचाराची घोडदौड प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे. 
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनीही संपर्क दौरा व पदयात्रा यानिमित्ताने गावोगावी भेटी देत पंढरपूर शहरातील पदयात्रा सुरु आहे. यासाठी मतदारांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला असल्याचे स्पष्ट चित्र पाहावयास मिळत आहे.

 विविध गावांना भेट दिली. व ग्रामस्थांशी संवाद साधला. 
ग्रामस्थांनी सांगितलेल्या अडीअडचणींवर येत्या काळामध्ये नक्कीच काम करून त्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन यादरम्यान अनिल सावंत यांनी दिले. 

प्रत्येक गावात महिलांनी औक्षण करून तर तरुणांनी जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. या प्रचारादरम्यान महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आणि पाठींबा पहावयास मिळाला.
 पाणी, रस्ते आणि आरोग्य याचसोबत रोजगार या महत्त्वाच्या विषयांवरती आपण काम करू असे आश्वासन अनिल सावंत यांनी या प्रचारादरम्यान ग्रामस्थांना दिले. येत्या काळामध्ये शैक्षणिक संकुल उभारून येथील मुलांची पुणे मुंबईची शैक्षणिक वारी कशी कमी करता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचे आश्वासन देखील अनिल सावंत यांनी केले. 
'राम कृष्ण हरी वाजवा तुतारी' अशा प्रकारच्या घोषणा देत ग्रामस्थांनी अनिल सावंत यांना आपला पाठिंबा दर्शवला. 
भविष्याच्या धोरणाकडे पाहताना या भागाचे परिवर्तन होईल असा विश्वास मनाशी बाळगत अनेक राजकीय व्यक्तींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यामध्ये आपला पक्ष प्रवेश केला. 
'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हा पुढील बटन दाबून असंच प्रेम येत्या काळामध्ये दाखवावं अशी विनंती यादरम्यान अनिल सावंत यांनी केली. दुपारपर्यंत आणि परत सायंकाळी पंढरपूर शहरात विविध भागात पदयात्रा काढण्यात आली. यामधून मतदारांनी अनिल सावंत यांना चांगला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले आहे.