*पाठिंब्यावर पाठींबाने अभिजीत पाटलांचे बळ वाढले* *माढा मतदारसंघात मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला*
पंढरपूर/प्रतिनिधी
संपूर्ण राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हाला मतदारांची मोठी पसंती असून या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांना रोज अनेक दिग्गज नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. तसेच त्यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. माढा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून बबनराव शिंदे यांच्या यांचे पुत्र श्री रणजीत शिंदे यांना प्रचारात पिछाडीवर सोडले आहे. अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित अरण येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कोकाटे व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संजय कोकाटे यांनी गत पंचवार्षिक निवडणुकी बबनराव शिंदे यांचे प्रमुख विरोधक म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
गेल्या आठ दिवसांपासून अभिजीत पाटील यांना अनेक गटांचा पाठिंबा मिळाला असल्याचे दिसत आहे. निवडणुकांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांना सहकार्य करणाऱ्या अनेक जणांनी यंदा परिवर्तनाचा निर्धार करत अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिल्याने आमदार बबनराव शिंदे यांच्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच तसेच शेवट पर्यंत प्रयत्न करूनही तुतारी चिन्ह न मिळाल्याने अपक्ष लढण्याची नामुष्की ओढावलेल्या पुत्र रणजीत शिंदे यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात असून यामुळे अभिजीत पाटील यांचा विजय सोपा मानला जात आहे.
यावेळी उपस्थित भारतनाना पाटील, संजय बाबा कोकाटे, भारत आबा शिंदे, बाळासाहेब पाटील, राजाभाऊ गायकवाड, अनिल पाटील, मधुकर अण्णा देशमुख, बाबूतात्या सुर्वे, रामकाका म्हस्के, पोपट तात्या अनपट, रावसाहेब नाना देशमुख, बाळासाहेबतात्या ढवळे, बलभीम आप्पा लोंढे, अमोल पाटील, प्रशांत पाटील, रंधवे सर, संजय मस्के, विलास बाप्पा देशमुख, गोविंदभाई देशमुख, ऋषिकेश बोबडे, जगदाळे दीपक आबा देशमुख, आनंद कानडे, भगत सर, विजय पवार, बेंबळे गावचे सरपंच सौदागर जाधव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..