*राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा** सामान्य नागरिकांपासून देशपातळीवरील नेत्यांनी दिल्या फाटे यांना शुभेच्छा*

*राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा**  सामान्य नागरिकांपासून देशपातळीवरील नेत्यांनी दिल्या फाटे यांना शुभेच्छा*

पंढरपूर /प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचा वाढदिवस पंढरपूर व परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. 

वाढदिवसानिमित्त नागेश फाटे यांना पक्षाच्या देशपातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर सामान्य नागरिकांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच सर्व पदाधिकारी, चेअरमन, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन व सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा देऊन सत्कार केला.तर वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्षाचे नेते नागेश फाटे यांना  दूरध्वनीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार प्रणितीताई शिंदे, आ.नारायण आबा पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, प्रतिभादेवी नागरी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे यांच्यासह आजी-माजी खासदार, आमदार यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. 

नागेश फाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय समाजसेवी संस्था गादेगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भास्करबापू बागल यांच्या हस्ते पार पडले. 
या शिबिरामध्ये ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना मिष्ठांन भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल अर्बन बँकेच्या वतीने करण्यात आले होते.

याप्रसंगी भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, विठ्ठलचे संचालक समाधान काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा संघटक सुधीर भोसले, महिला तालुकाध्यक्ष राजश्रीताई ताड, उपाध्यक्ष रूपाली पवार, ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष गुलाब भाई मुलानी,डॉ. मोहन शेवाळे, डॉ. सुधीर शिनगारे, डॉ. प्रसाद खाडीलकर, डॉ. प्रा. चंद्रकांत काळे, डॉ. मनोज पायगुडे, एडवोकेट पांडुरंग चवरे, एडवोकेट सिद्धेश्वर चव्हाण, पद्माकर बागल, उद्योजक संतोष बाबर, योगेश यारनाळकर, दीपक येळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुभाष बागल, बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय बागल, भगवान महाराज बागल, धैर्यशील बागल, बाजीराव बागल, स. शि.वसंतराव काळे सह. साखर कारखान्याचे व्हाईट चेअरमन भारत कोळेकर, संचालक योगेश ताड, मोहन नागटिळक, परमेश्वर लामकाने, ज्योतीराम पोरे, राजाभाऊ जगदाळे, सुधाकर कवडे, संजय बागल, विक्रम बागल, जयनाना देशमुख, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ, उद्योग व्यापारचे जिल्हा कार्याध्यक्ष तेजस बोबडे, तालुकाध्यक्ष दीपक बनसोडे, धाराशिवचे उद्योग व्यापारचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने, सप्तशृंगीचे चेअरमन आतुल चव्हाण, शुभारंभ अर्बनचे चेअरमन गणेश सूर्यवंशी, विठ्ठल अर्बनचे संचालक गोरख बागल, संजय पवार, अनिल बाबर, संजय बाबर, शांतिनाथ बागल, औदुंबर माने,मारुती घाडगे, केशव सूर्यवंशी, अभिमान काळे, हनुमंत फाटे, अभिमान पवार, रमेश फाटे, उमेश फाटे, उद्योजक अंकुश गव्हाणे, तुकाराम गिड्डे, बाळासो बागल उपस्थित होते.