*करकंब येथील DAV शैक्षणिक संकुलात महर्षी दयानंद जन्मोत्सव उत्साहात संपन्न* *आर्य समाजाचे संस्थापक व महान विचारवंत महर्षी दयानंद सरस्वती यांचा 198 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा.*

,*करकंब /प्रतिनिधी*
करकंब येथील 12 फेब्रुवारी रोजी *रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए.व्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु.काॅलेज करकंब येथे दयानंद शिक्षण संस्था सोलापूर यांचे स्थानिय सचिव श्री महेश चौप्रा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब येथे "महर्षी दयानंद सरस्वती जन्मोत्सव" 198 वा जयंती उत्सव अंत्यत उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी जगा च्या कल्याणासाठी "महर्षी दयानंद प्रशंसन यज्ञ" पंडीत राजवीर विद्यावाचस्पती व आर्य वेद सुमन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली "होम हवन" करण्यात आले या यज्ञा साठी श्री व सौ.हेमंत कदम ,श्री व सौ. धनवंत करळे ,श्री व सौ . महादेव पुजारी ,श्री व सौ.रमेश कविटकर यांनी सहभाग घेतला.*
*या जयंती महोत्सवानिमीत्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत 5वीते7वी (गटअ) मध्ये*
*रोहीत मच्छिंद्र नलवडे प्रथम,कु.सुमय्या नुरमोहम्मद काझी द्वितीय, कु.स्वालिया इन्नूस शेख तृतीय,आणि इ.8वीते10वी (गट ब )मध्ये रणजित बिभिषण वसेकर प्रथम,मुकुंद रमेश कविटकर द्वितीय, कु.सानिका रवींद्र गळीतकर तृतीय क्रमांक मिळविला.*
*चित्रकला स्पर्धेत इ.5वी ते 8वी(गट अ) स्पर्धेत कु.पायल बालाजी धायगुडे प्रथम, कु.अनुष्का महादेव पुजारी द्वीतीय,कु.श्रेया महेश डांगे तृतीय, आणि इ.8वी ते 10वी(गट ब) कु. श्रावणी शामराव भुसारे प्रथम,कु.गौरी रमेश ढोबळे द्वितीय, रोहन अशोक कुंभार तृतीय क्रमांक मिळविले.*
*या जन्मोत्सव कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष लक्ष्मण(तात्या)वंजारी,मा. जि. प. अध्यक्ष बाबुराव जाधव , मनोज पवार , सुनिल मोहिते, श्रीमती पवार मँडम, पर्यवेक्षक धनवंत करळे सर ,सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते,या वेळी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांनी प्रसादाचा आस्वाद घेतला*