*मूल्यनिष्ठ समाज बनविण्यासाठी ईश्वरीय सत्संगाची गरज आहे* * ब्रम्हाकुमारी उज्वला दीदी यांचे प्रतिपादन*

पंढरपूर/प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा पंढरपूर समाजसेवा प्रभाग व भारत सरकार पर्यटन व संस्कृती मंत्रालय यांच्या सहयोगाने महाशिवरात्रीचे औचित्य साधून भारत आजादी चा अमृत महोत्सव निमित्त समाजसेवी बंधू-भगिनींचा सत्कार व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून माननीय भ्राता सुधीर सुतार ( डेपो मॅनेजर पंढरपूर) , माननीय भ्राता प्रमोद भोसले ( पोस्ट ऑफिस प्रमुख पंढरपूर) , माननीय भ्राता सतीश काळुंगे ( उप अभियंता बीएसएनएल ऑफिस) , माननीय भ्राता लखन चौगुले (नगरसेवक पंढरपूर) , माननीय सौ रजनीताई देशमुख (सभापती महिला व बालकल्याण), माननीय भ्राता महेश ठोंबरे (न्यायाधीश ) , माननीय भ्राता सतीश सोमाजी (बिल्डर्स). तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक बंधू-भगिनी उपस्थित होते. त्या सर्वांचा श्रीफळ व ईश्वरीय साहित्य देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ब्रह्मा कुमारी स्मिता दीदी यांनी महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य सांगताना म्हणाल्या की आता कलियुगामध्ये अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे .अशावेळी ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी परमात्मा या धरतीवर येतात त्याचा यादगार दिवस शिवरात्रि आहे. उपवास हा बाईट अवगुणांचा करावयाचा आहे. ब्रह्माकुमारी उज्वला दीदी (पंढरपूर सेवाकेंद्र संचालिका) यांनी समाजाला स्वस्थ सुखी बनवण्याच्या काही टिप्स दिल्या. रोज सत्संग केल्याने आपल्या जीवनात मूल्य धारण होतील आपण सुखी होऊ . ब्रह्मा कुमारी स्वाती दीदी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी स्वागत डान्स कुमारी गायत्री व देशभक्तीवर डान्स कुमारी ईश्वरी यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मा कुमारी आणीता दीदी यांनी केले. त्यावेळी त्यांनी सांगितले भारताच्या आजादी महोत्सवा निमित्त ब्रह्माकुमारी च्या चार हजार सेवा केंद्राद्वारे विविध अभियान वीस सेवा प्रभागात द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.१५००० कार्यक्रमाद्वारे १० करोड लोकांची सेवा या मोहत्सव अंतर्गत समाजात विभिन्न संमेलन प्रतियोगिता मेळे ,संघगोष्टी आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रम सफल होण्यासाठी ब्रह्मा कुमारी वैष्णवी , ब्रह्मा कुमार नागेश पवार, ऋषिकेश पोरे, प्रकाश गौरवार, विलास वास्ते , चंद्रकांत मोरे, किरण शेटे यांचा अनमोल सहयोग लाभला.