*सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाची महत्वपूर्ण बैठक* *"राष्ट्रवादी भवन" पुणे येथे राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीसाठी राहणार उपस्थित*

पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदयोग व व्यापार विभाग राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीचे आयोजन दि ७ मार्च रोजी "राष्ट्रवादी भवन" पुणे येथे करण्यात आले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दिली आहे
या बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून राज्य कार्यकारणी चे पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष ,शहराध्यक्ष यांच्या उपस्थित राहणार आहेत.
उदयोग व व्यापार विभाग गुणात्मक, रचनात्मक आणि संघटनात्मक व्यापक काम उभे करण्याची जबाबदारी पद न मानता ही वैयक्तिक जबाबदारी समजुन येत्या काळात मोठ्या जोमानं एक टीम म्हणून आपण काम करूया व आगामी महानगरपालिका, नगरपालिका ,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्या विभागाची जबाबदारी आपण पेलूया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे करणार आहेत .
तरी महाराष्ट्र राज्यातील राज्य कार्यकारणी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे यांनी
प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे .