*पंढरीत राष्ट्रवादीचे वतीने देहू येथील घटनेचा केला निषेध*

*पंढरीत राष्ट्रवादीचे वतीने देहू येथील घटनेचा केला निषेध*


पंढरपूर/प्रतिनिधी

देहू येथे  नुकत्याच झालेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र  मोदीं यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात राज्याचे  उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना भाषण करण्यासाठी दिल्ली येथील  पंतप्रधान कार्यालयाने परवानगी नाकारली होती . याठिकाणी विरोधी नेत्यांना मात्र संधी दिली. यासाठी   पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर
जिल्ह्याच्या वतीने  गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
 यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा  कार्याध्यक्ष रंजनाताई हजारे,महिला ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष साधना राऊत, पंढरपूर शहर अध्यक्ष संगीता माने, शहर कार्याध्यक्ष सुनंदा उमाटे,  शहर उपाध्यक्षवनिता बनसोडे , सुभाषदादा भोसले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे ,शहराध्यक्ष सुधीर भोसले ,सचिन कदम, गिरीश चाकोते, राजाभाऊ सरवदे, चंद्रकांत जाधव, मनोज आदलिंगे, अनिल सपकाळ, कबीर कपिल, कदम,  रतन शिरसागर, नंदा परचंडे, रंजू बागवान ,लक्ष्मी कांबळे, अनुसया कांबळे, संगीता मस्के, संगीता जगताप, मेघा माने, सपना मेहेर ,रंजना मेहेर, ओबीसी सेलच्या पूजा कोळी, छाया खंडाळे, छाया खंडागळे आदी  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.