*आषाढी एकादशी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील लाखो वारकरी व  भाविकांना शुभेच्छा सह विशेष संदेश* 

*आषाढी एकादशी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील लाखो वारकरी व  भाविकांना शुभेच्छा सह विशेष संदेश* 

करकंब/ प्रतिनिधी -

आषाढी एकादशी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील लाखो वारकरी व  भाविकांना शुभेच्छा दिल्या असून माढा लोकसभेचे संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांच्या मार्फत  लिखित स्वरूपात विशेष संदेश दिला आहे.

     लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे निमित्ताने पायी चालत पंढरपूर या संत नगरीमध्ये आले असून आषाढी एकादशीला आलेल्या सर्वांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देत असून लाखो भाविक या पंढरपूर मध्ये आले असून आजही देशात सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूर मध्ये आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आजही प्राचीन काळापासून चालत आलेल्या या सोहळ्यात लाखो भाविक आले असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी शुभेच्छा दिल्या असून  महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर विठ्ठल मंदिर व  बहुतांश पालखी महामार्ग माढा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने वारकऱ्यांसाठी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकरी व विठ्ठल भक्तांना  शुभेच्छा पाठवल्या आहेत.