*विठ्ठल नामाच्या गजराने करकंब येथील देशमुख वस्ती जि.प.प्रा.शाळेचा परिसर दुमदुमला* *- बालगोपालानी काढली आषाढी वारीनिमित्त बाल दिंडी*

*विठ्ठल नामाच्या गजराने करकंब येथील देशमुख वस्ती जि.प.प्रा.शाळेचा परिसर दुमदुमला*  *- बालगोपालानी काढली आषाढी वारीनिमित्त बाल दिंडी*

करकंब /प्रतिनिधी :-
    जि.प.प्रा.शाळा देशमुख वस्ती,करकंब ता.पंढरपूर  येथे आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा करून दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.यामध्ये विठ्ठल,रुक्मिणी, वारकरी,टाळकरी,विणेकरी आदींसह वेशभूषा करून विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
    दिंडीच्या सुरुवातीस पालखी मधील विठ्ठल-रुक्मिणीच्या च्या फोटोचे पूजन व आरती करण्यात आली.नंतर विठ्ठल-विठ्ठल,जय हरी विठ्ठल,विठ्ठल माऊली,जय जय राम कृष्ण हरी असे भजन करीत वस्तीवरून दिंडीची फेरी काढण्यात आली.काही ठिकाणी गोल रिंगण करीत मुलींनी फुगड्या खेळत माऊली माऊलीचा गजर करीत परिसर दुमदुमून टाकला. 
    या दिंडी दरम्यान वस्तीवरील अनेक स्त्री-पुरुष दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी जणूकाही प्रत्यक्ष विठ्ठल-रुक्मिणी भेटल्याचा आनंदच नागरिकांना झालेला पाहायला मिळाला.
    दिंडी दरम्याम टाळ मृदुंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी भजन केले.गोल रिंगणावेळी विद्यार्थ्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली होती.ग्रामस्थ व शिक्षक यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.हा दिंडी पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी गावातील भजनी मंडळाचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी व्होटे, विजयकुमार जाधव,अंगणवाडीच्या शैला देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.