*पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचा विकास कामासाठी धुमधडाका* *मंगळवेढा तालुक्यातील पाणंद रस्त्याच्या निर्मितीसाठी ५ कोटी ७६ लाख रुपये मंजूर* *प्रती रस्ता २४ लाख रुपये मंजुरी*

*पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचा विकास कामासाठी धुमधडाका*  *मंगळवेढा तालुक्यातील पाणंद रस्त्याच्या निर्मितीसाठी ५ कोटी ७६ लाख रुपये मंजूर*  *प्रती रस्ता २४ लाख रुपये मंजुरी*

प्रतिनिधी /प्रतिनिधी 
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांशी जनतेसाठी शेती हे उपजीविकेचे आणि उत्त्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्त्पन्नातून तयार होणारे अर्थचक्र अनेकांच्या कौटुंबिक विकासासाठी महत्वाची बाब आहे मात्र अनेक ठिकाणी रस्त्याविना शेती नापीक ठेवण्याची वेळ येते ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो विभाग) संलग्न महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत आणि पाणंद रस्ते योजने अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील शेत आणि पाणंद रस्ते निर्मितीसाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत आणि पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या सन २०२२ - २३ या अर्थिक वर्षाच्या पुरवणी नॉनप्लॅन आराखडा अन्वये हा निधी मंजूर झाला आहे. मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध शेत आणि पाणंद रस्ते निर्मितीसाठी हा भरीव निधी मंजूर झाल्याने अनेक पाणंद रस्ते निर्मितीस चालना मिळणार आहे. या योजनेखाली मंजूर झालेल्या प्रत्येक पाणंद रस्त्यासाठी प्रत्येकी २४ लाख रुपये निधी प्राप्त होणार आहे. दळणवळणासाठी मुख्य बाबा रस्ता आहे ही गरज लक्षात घेऊन आ. आवताडे यांनी नागरिकांना शेतीकडे जाण्यासाठी आवश्यक तो रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासकीय दरबारी निधी मिळण्यासाठी रेटा लावला होता. आ. आवताडे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळून खालील पाणंद रस्त्यासाठी ५ कोटी ७६ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

*मंगळवेढा तालुक्यातील मंजूर झालेल्या पाणंद रस्त्यांची यादी पुढीलप्रमाणे-*
 
 रहाटेवाडी येथील कल्याण पवार वस्ती ते बळी पवार वस्ती रहाटेवाडी तामदर्डी रस्ता ते आवताडे पवार वस्ती, सलगर खु येथील मासाळ वस्ती भुसणार वस्ती चौंडे वस्ती ते तेलगाव वस्ती पासून बावची जाणारा रस्ता,ढवळस येथील लक्ष्मीदेवी मंदिर ते बाळासाहेब बावचे वस्ती रस्ता,उचेठाण येथील जैन वस्ती हरिजन वस्ती होनमाने वस्ती पाटील वस्ती कोळी वस्ती रस्ता, बोराळे येथील बोराळे गावठाण ते भालेवाडी मधला निगप्पा लंगोटी वस्ती,अरळी येथील अरळी ते बसनाळे वस्ती रस्ता, पोलीस स्टेशन ते मधला गणेशकर वस्ती रस्ता, येड्राव येथील येड्राव मरवडे  हद्दीवरील अमोल माने वस्तीपर्यंत, कागष्ट येथील कागष्ट ते डिकसळ, मौजे मरवडे येथील दिगंबर मासाळ घर ते काळा ओढा ,मारापूर येथील मारापुर गावठाण ते भाटेमळा कुलकर्णी वस्ती , मारापूर येथील घरनिकी - मारापुर नवबिगा ते अकोला रस्ता विठ्ठलवाडी वस्ती ते तानगावडे वस्ती, चोखामेळानगर येथील धनाजी खवतोडे वस्ती ते सोमनाथ गुरुजी वस्ती रस्ता, मौजे डोंगरगाव येथील डोंगरगाव ते हाजापूर शिव रस्ता डॉ हेंबाडे यांची घरापासून ते पाटखळला जोडणारा रस्ता, डोंगरगाव ते पाटखळ शिव रस्ता खडतरे वस्ती ते हेंबाडे वस्ती रस्ता, खुपसंगी येथील लवटे वस्ती ते जि. प.शाळा ते जगदाळे वस्ती रस्ता,  लोणार येथील वाघमोडे वस्ती ते बुरुंगले वस्ती, मौजे मारोळी येथील पोकळे वस्ती ते करे वस्ती रस्ता,महमदाबाद हु. येथील एकनाथ कोळकर वस्ती ते हुन्नूर लोणार रस्ता, लक्ष्मी दहिवडी येथील कांबळे वस्ती ते होनमाने वस्तीपासून ते रांजण स्टॉप पर्यंतचा रस्ता, भालेवाडी येथील भालेवाडी ते तळसंगी फाटा रस्ता, अकोला येथील अकोला रस्ता ते सावंजी वस्ती ते आसबे वस्ती रस्ता, चोखामेळानगर येथील आसबे वस्ती ते अकोला शिव रस्ता या रस्त्यांना निधी मंजूर झाल्याने तालुक्याच्या भौतिक विकासाचे चक्र अधिकच गतिमान होणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त केली जात आहे .

फोटो-समाधान आवताडे