*जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर - आ. समाधान आवताडे*

*जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर - आ. समाधान आवताडे*

प्रतिनिधी: /पंढरपूर 
'हर घर नल से जल' हा संकल्प घेऊन सरकारने जल जीवन मिशन योजना राबविली आहे या योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाख इतका निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
या निधी मंजूर झालेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना अधिक स्वरूपात सुलभ आणि विस्तारित करण्याच्या अनुषंगाने हा निधी खर्ची होणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या माध्यमातून गावामध्ये पाणीटाकी उभी करणे, पाण्याचे व्यवस्थापन होण्यासाठी घरोघरी नळ बांधणे व  पाणीपुरवठा साधने विकसित करण्यासाठी हा निधी अतिशय महत्वपूर्ण आहे. आ. आवताडे यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडविण्यासाठी प्राधान्य दिले असून त्यांनी आरोग्य, रस्ते व पाणी या बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करून विविध मार्गांनी शासनदरबारातुन निधी मतदारसंघामध्ये खेचून आणला आहे. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना अत्यंत आवश्यक आहे. जनतेची नेमकी हिच गरज ओळखून आ. आवताडे यांनी सतत पाणीपुरवठा विभागाकडे आपला पाठपुरावा करत परिपूर्ण प्रस्तावांची मंजुरी घेत  निधीची तरतूद आपल्या पदरात पाडून घेतली असून अपूर्ण प्रस्ताव असणाऱ्या गावांनाही तात्काळ त्रुटींची पूर्तता करून फेरप्रस्ताव सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत.

 *जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर निधी व  गावांची नावे -* 

अरळी ४६ लाख ७७ हजार, बोराळे ९२ लाख ६८ हजार, मुंढेवाडी ४२ लाख २२ हजार, रड्डे १ कोटी २८ लाख ८६ हजार, उचेठाण ९६ लाख ६९ हजार, येड्राव १ कोटी १८ लाख ६३ हजार, देगांव ४९ लाख ७२ हजार, धर्मगांव ६१ लाख ६८ हजार, गुंजेगाव १ कोटी ७३ हजार, हुन्नूर १ कोटी २४ लाख ५३ हजार, लवंगी ५७ लाख १९ हजार, लेंडवे चिंचाळे ३० लाख २५ हजार, मानेवाडी ७२ लाख १७ हजार, निंबोणी १ कोटी ५ लाख ७६ हजार, सलगर बु. १ कोटी १९ लाख १७ हजार, सोड्डी ५५ लाख ४१ हजार, तामदर्डी ६३ लाख ४ हजार अशा स्वरूपात निधी मंजूर झाला आ