*थकबाकी भरून संस्थेच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करा:- चेअमनपद काळे *निशिगंधा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.,*
पंढरपूर /प्रतिनीधी
- येथील निशिगंधा बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चेअरमन कल्याणराव काळे यांनी बँकेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेऊन रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने ७ टक्के लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा केला जाईल असे जाहिर केले. तसेच थकबाकीदारांनी आपली थकबाकी वेळेत भरून बँकेस सहकार्य करावे व होणारी कटु कारवाई टाळावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.*
योगभवन, भक्तीमार्ग येथे पार पडलेल्या सभेच्या सुरूवातीस श्री. विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर व्हा. चेअरमन आर. बी. जाधव, संचालक देविदास सावंत, डॉ. मंदार सोनवणे, सतीश लाड, भागवत (महाराज) चवरे, विवेक कवडे, भानुदास सावंत, डॉ. राजेंद्र जाधव, अॕड. क्रांती कदम, शोभा लाड उपस्थित होते.
*व्यवस्थापक कैलास शिर्के यांनी विषय वाचन केले, त्यास सर्व उपस्थित सभासदांनी आवाजी मतदानाने मंजूरी दिली. यावेळी अहवाल सालातील दिवंगत सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.*
यावेळी बँकेचे सभासद जेष्ठ कर सल्लागार संजीव अभ्यंकर, धनंजय कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. सभेस सभासद यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन् शहाजी साळुंखे, अर्जुन जाधव, दिपक शेगर, रमेश नागणे, बंडु अटकळे, लालचंद चोले, अनिल निकते, सतिश कटकधोंड, रामचंद्र जाधव, नंदकुमार जोशी, सत्यवान काळे (सर), सौ. अश्विनी साळुंखे, सुभाष भोसले, कैलास कारंडे, महेश चव्हाण, अतुल झांबरे, अरून लाड, श्रीमती संजीवनी शिरसाठ, नागनाथ मुदगल, विष्णु सुरवसे, आदि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
*सभेच्या पुर्वी एक तास सभासदांसाठी आयोजित केलेल्या " सभासद प्रशिक्षण ” वर्गामध्ये सहकार प्रशिक्षण केंद्र, शाखा सोलापूर यांचे प्रतिनिधींनी सभासदांचे हक्क व कर्तव्ये, ९७ व्या घटना दुरूस्तीचे परिणाम, याबाबतची सखोल माहिती यावेळी देण्यात आली.*
सुत्रसंचालन सुधाकर कवडे यांनी केले, आभार व्हा. चेअरमन् आर. बी. जाधव यांनी मानले.
फोटो ओळ :- निशिगंधा सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत बोलताना चेअरमन कल्याणराव काळे.
चौकट :
आदर्श सभासद म्हणून यांचा झाला सत्कार सौ.भाग्यश्री बडवे ,श्री. नंदकुमार देवकर, श्री. अन्वरहुसेन शेख, श्री हरि लिंगे,श्रीमती निला कारटकर, श्री अजीत जाधव,अॅड श्री. ज्ञानदेव शिकारे, श्री. संजय कौलवार,श्री. जितेश ढोबळे,श्री. बजरंग डोंबे
बँकेचा ताळेबंद - दि. ३१/०३/२०२२ अखेर
सभासद संख्या : ४६६९
ठेवीदार संख्या : २१९६७
भागभांडवल : १ कोटी ४२ लाख ८४ हजार २००
ठेवी : ३१ कोटी ९४ लाख २९ हजार ७७५
कर्जे : १८ कोटी ७८ लाख ३० हजार २२३
गुंतवणूक : १३ कोटी ७६ लाख १४ हजार ९४०
ढोबळ नफा : ४५ लाख ३१ हजार ६४४
निव्वळ नफा : २३ लाख ३१ हजार ६४४
खेळते भांडवल : ३७ कोटी १९ लाख ७६ हजार