*शिवरत्न व शिवप्रेमी मंडळाने आगळा वेगळा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली-सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू* *शिवरत्न सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेचा पोलीस तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम उत्साहात संपन्न.*
करकंब/ प्रतिनिधी:
-येथील शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, व शिवप्रेमी तरुण मंडळ यांनी राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाच्या द्वारे आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे मत करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरेश तारू यांनी व्यक्त केले. ते करकंब येथील थोरली वेस् येथेआयोजित केलेल्या पोलीस तंदुरुस्त बंदोबस्त या सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.*
*शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था,थोरली वेस् करकंब यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गणेश उत्सवाचे औचित्य साधून याही वर्षी करकंब पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पोलीस तंदुरुस्त बंदोबस्त या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते*.
*पोलिसांना सातत्याने सण उत्सव व इतर कारणांनी बंदोबस्तासाठी जावे लागते. त्यांच्या आरोग्यासाठी म्हणून या मंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला जातो.*
*सुरुवातीस श्री ची पूजा करकंब पोलीस ठाण्यात स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर शिवरत्न सामाजिक व बहुउद्देशीय संस्था आणि शिवप्रेमी तरुण मंडळ थोरली वेस करकंब यांच्या वतीने उपस्थित करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, पदोन्नती झालेले पोलीस उपनिरीक्षक शशिकांत कविटकर, पोलीस उपनिरीक्षक संजय मंगेडकर, पोलीस उपनिरीक्षक संजय फुगारे, तसेच पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमांतर्गत अल्पोपहार चे वाटप करण्यात आले.*
*या कार्यक्रमा वेळी पोलीस स्टेशनचे अधिकारी व सर्व पोलीस कर्मचारी, शिवरत्न सामाजिक व संस्थाचे पदाधिकारी सदस्य तसेच शिवप्रेमी तरुण मंडळ सर्व पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते*.