*राष्ट्रीय अध्यक्ष खा शरद पवार यांची उद्योग व व्यापार विभाग प्रदेश अध्यक्ष. नागेशदादा फाटे यांनी थेट दिल्ली येथे भेट* *पंढरपूर तालुक्यातील जनतेसाठी फारच अभिमानाची गोष्ट*

पंढरपूर/प्रतिनीधी
दि . ११ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन लालकठोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे संपन्न झाले .या अधिवेशनास माजी मंत्री तथा राष्ट्रीय महासचिव मा. श्री प्रफुल भाई पटेल, माझी उपमुख्यमंत्री मा . श्री अजितदादा पवार , खा .सुनील तटकरे ,माजी मंत्री मा . श्री . छगन भुजबळ माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा . श्री जयंतराव पाटील,खा . सुप्रियाताई सुळे देशभरातील माजी मंत्री खासदार आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी पवार साहेबांची फेर निवड झाल्यामुळेअभिनंदनचा ठराव मांडण्यात आला .तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व्यापक स्वरूपात अमलात आणून नवयुवकांना जास्तीत जास्त या पक्षात संधी देण्यात येईल असे आश्वासन पवार साहेबांनी दिले .हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्री धीरज शर्मा युवती अध्यक्षा कु सोनिया दहन यांनी प्रयत्न केले तसेच मा . खा .शरदचंद्रजी पवार साहेब यांची ६ जनपथ दिल्ली येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष मा . श्री .नागेश फाटे यांनी भेट घेऊन आपल्या वर्षभरातील केलेल्या कार्याचाआढावा सादर करून नवीन व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा केली .
.या अधिवेशनास पवार साहेब यांच्या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार विभागाचे पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष श्री . केतन सदाफुले , श्री . पारीजात दळवी , प्रदेश सरचिटणीस श्री .निलेश शहा , प्रदेश चिटणीस श्री .प्रल्हाद डिसले ,श्री शरीफ मेमन ,प्रदेश सचिव श्री कल्याण कुसूमडे , प्रदेश सदस्य श्री श्रीकांत पवार , औरंगाबाद जिल्हाध्यक्ष श्री सुनील औटी ,मालेगाव शहर अध्यक्ष श्री शेख रमजान , वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री . अभिषेक ऊराडे ,श्री सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब नागटिळक आदि पदाधिकारी उपस्थित होते .