*नांदोरे येथील ज्ञानदीप मध्ये पैठणीचा खेळ आणि दांडिया उत्साहात साजरा.*

करकंब/ प्रतिनिधी :-
नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर.आणि याच नवरात्रीचे औचित्य साधून ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज नांदोरे मध्ये शनिवार दिनांक ०१/१०/२०२२ रोजी " होम मिनिस्टर - रंगणार खेळ पैठणीचा" हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महीला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ. रेश्मा देविदास नाईकनवरे लाभल्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. आरती दिपक थिटे व सौ. पुनम प्रवीण पाटील या लाभल्या होत्या. प्रथम नवरात्री ची आरती घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महीलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा , मटकी फोडणे , चित्राला टिकली लावणे , बॅलन्सिग गेम , सुईत दोरा ओवणे , तळ्यात मळ्यात अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आणि यातून अंतिम चार स्पर्धक काढण्यात आले. पहिल्या विजेत्या स्पर्धकांला "पैठणी" दुसरया विजेत्या स्पर्धकांला " नथ " तिसऱ्या विजेत्या स्पर्धकांला " डिनर सेट" व चौथ्या विजेत्या स्पर्धकांला " पर्स" अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.