*करकंब येथील खंडोबा देवस्थान यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.*
करकंब /प्रतिनिधी:-
करकंब (सोमवार पेठ; काळा मारुती) येथील श्री खंडोबा देवस्थान यात्रा महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.
यात्रा महोत्सवाचे आयोजन सोमवार पेठ काळा मारुती येथे असलेल्या श्री खंडोबा मंदिरात दररोज पूजा अर्चा विविध धार्मिक कार्यक्रम तसेच वाघ्या मुरळीचा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. भाविकांची ही मोठी गर्दी होती.
पंचास्टमीनिमित्त करकंब व परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी महिलावर्ग यांनी श्री खंडोबा देवस्थान मंदिरात येऊन श्री खंडेरायाचे दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केला. पंच अष्टमी निमित्त यावेळी श्री खंडोबा मंदिर देवस्थान ते सोमवार पेठ काळा मारुती ते आतार चौक ते थोरली वेस् ते भगत वाडा या ठिकाणी श्री खंडेरायाच्या पालखीचे मोठ्या उत्साहात सहवाद्यासह श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी आणण्यातआली. यावेळीही भगत वाड्यामध्ये श्री खंडेरायाच्या पालखीचे प्रथेप्रमाणे परंपरेने पूजा- अर्चा व धार्मिक पद्धतीने कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी अनेक महिला भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.