*करकंब येथे गीता जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरुवात.*
.
करकंब /प्रतिनिधी
:-सालाबाद प्रमाणे याही वर्षी गीता जयंतीनिमित्त कै. सद्गुरु बजरंग (तात्या) पिसे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने समस्त करकंब ग्रामस्थांच्या सहकार्याने ह भ प श्रीकांत महाराज आरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब( कसबा पेठ) येथील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर येथे मोठ्या उत्साहात धार्मिक भक्ती भावाने मार्गशीर्ष शुद्ध 6- मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी पासून धार्मिक सोहळा सुरू आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह मार्गशीर्ष शुद्ध 6 - मंगळवार दिनांक-29नोव्हेंबर पासून ते मार्गशीर्ष शुद्ध14- मंगळवार दिनांक 6 डिसेंबर रोजी संपन्न होईल.
या अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक सोहळ्याचे दहावे वर्षा पासून सोहळ्यात पहाटे चार ते सहा काकडा, सहा ते सात श्री अभिषेक, सात ते आठ विष्णुसहस्रनाम, आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण, बारा ते एक भोजन, दुपारी एक ते तीन भजन, दुपारी चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ, संध्याकाळी सातला ते नऊ कीर्तन व त्यानंतर भोजन असून या धार्मिक सोहळ्यात गणेश महाराज बेलकर. पारनेर, अंकुश महाराज रणखांबे. गिरवी, मोहन महाराज बेलापूरकर.पंढरपूर, भागवत ज्ञमहाराज शिरवळकर. पंढरपूर, विश्वंभर महाराज कदम. रोपळे, महादेव महाराज कानडे. पट्टी वडगाव, अनिरुद्ध महाराज निंबाळकर. बिटरगाव, यांचे कीर्तन बरोबरच महाराज लिमगिरि. तुळशी, नवनाथ महाराज जळवली, महाराज थोरात .करकंब, विजय महाराज गुरव . उंबरे, शंकर महाराज गोसावी. नेमतवाडी, चारुदत्त महाराज देशपांडे. भोसे,तुळशीदास महाराज गायकवाड. पेहे, त्यांचा प्रवचनाचा धार्मिक कार्यक्रम तर गीता जयंतीनिमित्त रविवार चार डिसेंबर रोजी दहा ते बारा गीता पाठ मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी सात ते नऊ दिंडी नगर प्रदक्षिणा होईल.दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा ह भ प श्रीकांत महाराज आरोळे यांचे काल्याचे किर्तन संपन्न होईल. व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
या अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक सोहळ्यासाठी मिलिंद देशपांडे, संतोष लोंढे, त्रिवेणी संगम, विठ्ठल शिंदे ,परमेश्वर शिंदे, अभिमान शेळके, सुनील जगताप, सुरेश बाबर, सोमनाथ गुंड , किरण गुरव, औदुंबर खडके, महादेव देशमुख, लक्ष्मण जाधव, राजाराम गाडे, विठ्ठल हराळे, रामचंद्र कवडे, भारत आरकस, नागनाथ खाडे, नारायण व्यवहारे, शंकर डोळे, झाकीर शेख ,समाधान माळी, भारत धायगुडे, महादेव खपाले,कै. कृष्णात खपाले स्मरणार्थ, सुखदेव खपाले, सतीश देशमुख ,राजेंद्र शेटे, सुनील जाधव, कै. गोरोबा चव्हाण स्मारणार्थ, यांचे बरोबरच धोंडीराम काशीद व तानाजी काशीद, वैजिनाथ राऊत जळवली, सांगवी ,तुळशी, पेहे, भोसे, पांढरेवाडी ,घोटी, नेमतवाडी, गुरसाळे ,बार्डी ,जाधव वाडी, व परिसरातील सर्व टाळकरी आणि श्री विठ्ठल मंदिर विश्वस्त, सप्ताह समिती, भक्त, गावातील सर्व भक्त मंडळ, समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.