*जळोली येथे शेतीच्या वादातून जिवघेणा हल्ला.* *एकजण गंभीर जखमी* *आरोपींना पोलीसांनी केले जेरबंद.*

*जळोली येथे शेतीच्या वादातून जिवघेणा हल्ला.*  *एकजण गंभीर जखमी*   *आरोपींना पोलीसांनी केले जेरबंद.*

करकंब/ प्रतिनिधी 

जळोली ता.पंढरपूर येथे सोमवार दि. 06 रोजी सायं. 05.00 वा. चे सुमारास शेतीच्या बांधाचे दगडाचे कारणावरुन कोयते, काटया व दगडाने दोन शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या गटात तुफान हाणामारी झाल्याने या शेतीच्या वादातून जिवघेणा हल्ल्याची घटना घडल्याने करकंब सह परिसरात खळबळ उडाली आहे. 

 पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, सोमवार दि. 06 रोजी सायं. 05.00 वा.चे सुमारास  अमर किसन नरसाळे व किसन भानुदास नरसाळे यांनी गणेश विलास मदने यास आमचे शेतातील बांधावरील दगड का काढला अशी विचारणा केली असता चिडून जाऊन गणेश मदने याने संगनमत करुन बेकायदेशिर जमाव जमवून अमर किसन नरसाळे, किसन भानुदास नरसाळे व उलका किसन नरसाळे रा. भायगुडे वस्ती, जळोली तिघांना शिवीगाळ, दमदाटी करुन विलास ज्ञानोबा मदने, गणेश विलास मदने यांनी शिवीगाळ दमदाटी करुन त्यांचे हातातील कोयत्याने, विळ्याने, काठीने, केबल वायरने, दगडाने मारहाण करुन तुम्हाला जिवंत ठेवत नाही म्हणून विलास ज्ञानोबा मदने व गणेश विलास मदने यांनी हातातील कोयत्याने किसन भानुदास नरसाळे यांचे डोक्यात वार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद करकंब पोलीस ठाणेत दिल्याने करकंब पोलीस ठाणेत भा.द.वि .कलम 307,324,504,506,143,147,148,149 सह भारतीय शस्त्र आदि 1959 चे कलम 4,25 व मपो अधिनियम कलम 135 प्रमाणे विलास ज्ञानोबा मदने, गणेश विलास मदने, विकास विलास मदने, सचिन मारुती मदने, राजू मारुती मदने, विजया विलास मदने, सुभद्रा मारुती मदने, प्रियंका विकास मदने, अनिता सचिन मदने सर्व रा. जळोली यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक निलेश तारु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे  हे करीत आहे.