*पांढरेवाडी येथे शिवजयंती निमित्त भव्य खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन....!* *शिवजन्मोत्सव सोहळा..* *भव्य रक्तदान शिबिर व ग्राम स्वच्छता अभियान.*

*पांढरेवाडी येथे शिवजयंती निमित्त भव्य खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन....!*   *शिवजन्मोत्सव सोहळा..*  *भव्य रक्तदान शिबिर व ग्राम स्वच्छता अभियान.*

करकंब /प्रतिनिधी :

-पांढरेवाडी तालुका पंढरपूर येथे "शिवजन्मोत्सव" सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाबरोबरच भव्य खुल्या "राज्यस्तरीय वकृत्व" स्पर्धेचे आयोजन पांढरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
          सालाबाद प्रमाणे याही वर्षी पांढरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने "शिवजयंती" सोहळ्यानिमित्त "छत्रपती शिवाजी महाराज "यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक- १७/०२/२०२३ रोजी सायंकाळी- ५  वाजता भव्य खुल्या "राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे "आयोजन करण्यात आले असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी गेली तीन वर्षे झाली शिवजयंतीच्या निमित्ताने "रक्तदान " शिबिराचे आयोजन करण्यात येत असते, याही वर्षी भव्य 'रक्तदान शिबिर "व "ग्राम स्वच्छता अभियान" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
     शनिवार दिनांक- १८/०२/२०२३ रोजी सकाळी-८:०० वाजता भव्य "रक्तदान शिबिर" व 'ग्राम स्वच्छता" अभियान तसेच रविवार दिनांक-१९/०२/२०२३ रोजी सकाळी-८:०० वाजता सांस्कृतिक लेझीम पथकासह भव्य रॅली व सायंकाळी-७:०० वाजता "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या प्रतिमेचे पूजन व भव्य बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
      "पांढरेवाडी" ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या "शिवजन्मोत्सव " सोहळ्यानिमित्त भव्य खुल्या "राज्यस्तरीय "स्पर्धा-दिनांक १७ फेब्रुवारी रोजी -इयत्ता-१ ली ते ५ वी(लहान गट), विषय- १) छत्रपती शिवाजी महाराज २) मी माजी सैनिक झालो तर, ३) वृक्षवल्ली आम्हा वनचरे, ४) स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ,५) या विषया व्यतिरिक्त इतर कोणताही विषय, (वेळ-३ मिनिट+१ मिनिट), प्रथम क्रमांक-सन्मानचिन्ह व ११०१/-रुपये, द्वितीय क्रमांक-सन्मानचिन्ह व ७०१/-, तृतीय क्रमांक सन्मानचिन्ह व ५०१/-, ते उत्तेजनार्थ-सन्मानचिन्ह, संपर्क- अवधूत घाटे-मो. नंबर -९५७९८१११०१, नामदेव उकरंडे-मो. नंबर - ९८६०५६६५९३., "मध्यम गट"-इयत्ता ६ वी ते इयत्ता-९ वी,(वेळ-४+१) मिनिटे, प्रथम क्रमांक-सन्मान चिन्ह व २१०१/-रुपये, द्वितीय क्रमांक-सन्मान चिन्ह व१५०१/-, तृतीय क्रमांक-समानचिन्ह व ७०१/-रुपये, उत्तेजनार्थ-सन्मान चिन्ह, विषय-१) मोबाईल -शाप की वरदान, २) अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस, ३) छत्रपती शिवाजी महाराज, ४) बळीराजा: बळी की राजा ?, ५) फॅशनच्या पदरात हरवली आईच्या पदराची उब, संपर्क-युवराज घाटे-मो.नंबर-९८३४७००५५४, नाळे सर-मो. नंबर-८९७५४२५६७० तसेच खुला गट-इयत्ता दहावी पासून पुढे (वेळ-५+२ मिनिटे,) प्रथम क्रमांक-७००१/-रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-५००१/-व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-३००१/-व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ -सन्मानचिन्ह(२), विषय- १)स्वराज्याचा धगधग धगधगता यज्ञकुंड: छत्रपती संभाजी महाराज,२) व्यसनाच्या चक्रव्यूहात अडकलेली आजची तरुण पिढी, ३) स्त्रिया वरील वाढता अत्याचार: संरक्षण व उपाय, ४) कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ५) युग प्रवर्तक: छत्रपती शिवाजी महाराज. संपर्क -फाळके गुरुजी मो. नंबर-९७६७३८०४८९, खपाले सर-मोबाईल नंबर-९७६१७८४६२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेची नोंदणी दिनांक-१६/०२/२०२३ रोजी करणे आवश्यक असून परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील, एकाच क्रमांकास दोन नंबर आल्यास बक्षीस विभागून देण्यात येईल. तरी पांढरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव निमित्ताने  या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धकानी
 सहभागी होण्याचे आवाहन पांढरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.