*करकंब येथे शिवजयंती उत्साहात साजरी.* *मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देत .. थोरली वेस् येथील छत्रपती श्रीमंत राजे मध्यवर्ती ,  मंडळाचा वेगळा आदर्श.....!*

*करकंब येथे शिवजयंती उत्साहात साजरी.*   *मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देत .. थोरली वेस् येथील छत्रपती श्रीमंत राजे मध्यवर्ती ,  मंडळाचा वेगळा आदर्श.....!*

करकंब/ प्रतिनिधी :

-हिंदवी स्वराज्याचे थोर संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करकंब येथे मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
   करकंब येथील थोरली वेस येथे असलेल्या शिवकालीन वेशीच्या बुरुजावर शिवजयंतीच्या चार दिवस अगोदरच मोठ्या प्रमाणात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.     शिवकालीन सोळाव्या शतकातील वेशीच्या बुरुजावर शिवजयंती चे औचित्य साधून सुमारे 42 फुटाचा खांब उभारून भगवा ध्वज फडकवण्यात आला. या भगवा ध्वजा ची उंची बुरुजाच्या तळापासून सुमारे" 82 "फुटापर्यंत असून "थोरली वेस" येथील "छत्रपती श्रीमंत राजे मध्यवर्ती मंडळ "च्या वतीने आणि ग्रामस्थांच्या लोकसभागातून या ध्वजाची उभारणी करण्यात आली. त्याचबरोबर गतवर्षीपासून "मिरवणुकीच्या खर्चास" फाटा देत या "सोळाव्या शतकातील" शिवकालीन असलेल्या वेशीचे सुशोभिकरणाचे काम लोकसभागातून हाती घेऊन करकंब सह पंचक्रोशीतचं नव्हे तर राज्यामध्ये एक आगळा - वेगळा आदर्श निर्माण केला.


   या शिवजयंतीच्या निमित्ताने दिनांक-१९ फेब्रुवारी रोजी शिवकालीन सोळाव्या शतकातील वेशीवर सकाळी "भगवा ध्वज" फडकवल्यानंतर थोरली वेस येथे "छत्रपती शिवाजी महाराज"  यांची प्रतिष्ठापना करून  महापूजा "छत्रपती श्रीमंत राजे मध्यवर्ती मंडळाचे"-विवेक शिंगटे, प्रफुल्ल कुमार गोडसे, तसेच  "शिवरत्न" मंडळाचे अध्यक्ष- गणेश शिंदे,संदीप अभंगराव यांच्या शुभहस्ते करण्यात आली. महापूजेनंतर "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" मूर्ती स या सर्वांच्या वतीने पुष्पहारअर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक-महेश मुंडे, पोलीस उपनिरीक्षक-अजित मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना  विनम्र अभिवादन केले.
     या शिवजन्मोत्सव सोहळ्यास  करकंब येथील पदाधिकारी, ग्रामस्थ, शिवभक्त तसेच विविध मंडळाचे पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी "छत्रपती श्रीमंत राजे मध्यवर्ती मंडळा" च्या वतीने अमरसिंह चव्हाण यांनी या सोळाव्या शतकातील वेशीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले असून या कामासाठी लोकसभागातून बऱ्याच प्रमाणात खर्च झालेला आहे. तसेच या वेशीच्या पुढील खर्चासाठी जास्तीत जास्त लोकसभागातून या वेशीच्या सुशोभीकरण करण्याचे काम करण्यासाठी खर्च अपेक्षित असून यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.
      या वेशीच्या सुशोभीकरणासाठी करकंब येथील जागर स्वच्छता अभियान टीम व लेकी चे झाड