*पद्मश्री पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात.*  *दिग्दज कलाकारांची हजेरी.* 

*पद्मश्री पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात.*   *दिग्दज कलाकारांची हजेरी.* 

करकंब /प्रतिनिधी :-

     पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात त्यांचेच शिष्य पं.हेमंत पेंडसे यांची दमदार गायकी,सुब्रतो डे यांची सतारीवरील मोहून टाकणारा आविष्कार,आणि तरुणांनाही लाजवणाऱ्या उत्साहात स्वरयोगीनी डॉ.प्रभाताई अत्रे या तिन्ही त्रिवेणी संगमाने पहिला दिवसाची सुरुवात मनमोहक तितकीच स्वरमयी झाली,
तरंगिणी सांस्कृतिक  प्रतिष्ठान पुणे आणि आपला परिसर यांच्या वतीने आयोजित मेहता महोत्सवाचे १६वर्ष आहे, पुणे येथे सुरू असलेल्या या संगीत महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यामध्ये जेष्ठ आणि श्रेष्ठ गायक पं.विनायक थोरवी,आदरणीय जेष्ठ गायक विनायक थोरवी,आयोजक पं.शौनक अभिषेकी,माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर,विद्वेष रामदासी, आदीं मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी प्रतिवर्षाप्रमाणे पं.जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार जेष्ठ गायिका- आशाताई खाडीलकर यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला व संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा गायकांना पं.जितेंद्र अभिषेकी युवा पुरस्कार -आदित्य खांडवे यांना प्रदान करण्यात आला.
त्यानंतर पहिल्या दिवसाच्या संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात करताना पं हेमंत पेंडसे यांच्या दमदार गायनाने झाली, त्यामध्ये त्यांनी राग हमीर आणि मधुवंती आणि शेवटी अभिषेकी बुवांची संगीतबध्द केलेली आधी रचिली पंढरी रचना गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला- सुभाष कामत, हार्मोनियम -उदय कुलकर्णी, पखवाज- ज्ञानेश्वर दुधाणे, तानपूरा -यश कोल्हापूरे यांनी केली. त्यानंतर ख्यातनाम जागतिक कीर्तीचे सतारवादक पं.सुब्रतो डे यांच्या सतारवादनाला सुरुवात झाली त्यांनी राग किरवाणी सादर केला,त्यांना तबल्याची अप्रतिम साथसंगत- अजिंक्य जोशी यांनी केली,आणि पहिल्या दिवसाच्या संगीत महोत्सवाची सांगता तरुणांना लाजवणाऱ्या वयाच्या ९० दीच्या उत्साहात स्वरयोगीनी डॉ प्रभा अत्रे यांच्या गायनाने झाली.त्यामध्ये त्यांनी कौशीकरंजनी सादर करत स्वनिर्मित राग मधुरकंस सादर करत शेवटी भैरवीत सरस्वतीची हेबंदिश गाऊन सांगता केली. त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला पांडुरंग मुखडे, हार्मोनियम- राहुल गोळे,स्वरसाज- आरती कुंडलकर  अश्विनी मोडक यांनी केली.तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नेक अंतराष्ट्रीय कलाकारांचा आविष्कार सादर होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आपला परिसर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

फोटो ओळ:-पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात पंडित हेमंत पेंडसे यांचे गायन , साथ संगत तबला- सुभाष कामत, हार्मोनियम- उदय कुलकर्णी, पखवाज - ज्ञानेश्वर दुधाने, तानपुरा कोल्हापूरे.