*करकंबमध्ये राष्ट्रीयकृत बँकेची गरज.....!* *सध्याच्या भारतीय स्टेट बँक शाखेवर येतोय कामाचा ताण*. *ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक महिलांना होतोय मानसिक त्रास.*
करकंब/ प्रतिनिधी
- करकंब हे गाव लोकसंख्येच्या मानाने पंढरपूर तालुक्यामध्ये १नंबरचे गाव आहे. तसेच करकंब व करकंब परिसरातील २६ खेड्यांची मोठ्या प्रमाणातअर्थीक उलाढाल याच भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून होत असते. मात्र गावात हजारो ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक, शासनाच्या विविध योजनातील लाभार्थी, असंख्य शेतकरी महिला वर्ग या बँकेचे ग्राहक् तथा खातेदार असतानाही सोमवार पेठ करकंब येथील ही राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँक गावाच्या बाहेर गेल्याने याचा प्रचंड त्रास गावकऱ्यांना महिलांना विशेषता वयोवृद्ध आणि महिलांना सहन करावा लागत असल्याने विशेष म्हणजे ही बँक गावाबाहेर गेल्याने पेन्शनधारक, जेष्ठ नागरिक ,आणि महिलांना याचा भविष्यात आर्थिक फटका (झळ )बसण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. करकंब गावात राष्ट्रीयकृत बँकेची गरज सध्या भेडसावत असल्याचे चित्र दिसून येत असून अनेक जणांनी ही राष्ट्रीयकृत बँक गावाबाहेर गेल्याने जणांनी संताप व्यक्त केला आहे.
शेती विभाग अधिकारी व लिपिक या जागाही रिक्तच असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच या शाखेचे व्यवहार चालू आहेत. त्यातच भारतीय स्टेट बँकेचे ३० जानेवारी रोजी गावापासून १कि.मी. अंतरावर असलेल्या अभिमान नगर,जळोली चौक येथे स्थलांतरण झाले आहे.करकंबमध्ये मोठया प्रमाणात निवृत्तीवेतनधारक,जेष्ठ नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे त्यांचीही ही बँक गावाबाहेर गेल्यामुळे गैरसोय झाली आहे.
अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे संबंधित बँक कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण वाढत आहे.अपुरा कर्मचारी वर्ग हा मोठा प्रश्न आहे.सर्व सेवा व मोकळ्या जागेत पार्किंगची सुविधा असणाऱ्या अभिमाननगर मध्ये शाखेचे स्थलांतर व नुतन शाखेचे फर्निचर व सर्व व्यवस्था झाल्या असल्यातरी यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे.अनेक वर्षापासून ज्या जागा रिक्त आहेत त्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत.नूतन इमारतीमध्ये सुद्धा यापुढे कर्मचारी कधी भरणार?सेवा सुविधा चांगल्या पद्धतीने व वेळेवर नागरिकांना मिळणार का? अश्या प्रकारची विचारणा ग्राहकांकडून केली जात आहे.
अपुरा कर्मचारीवर्ग असला तरी सेवा सुविधा देण्यासाठी रात्री उशीर पर्यंत कामकाज चालू असते.
या सर्व बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष घालून लवकरात- लवकरअपुऱ्या कर्मचाऱ्यांजागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून करकंब आणि परिसरातील नागरिकांना चांगली सेवा,सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावा. आणि विशेषता करकंब गावात करकंब गावातील लोकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेची मागणी ग्राहक वर्गातून जोर धरू लागली असून अशी मागणी होत आहे.