*प्रा .अमोल कवडे यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी.*  *बार्डीसह करकंब पंचक्रोशीतून अभिनंदनाचा होतोय वर्षाव....!*

*प्रा .अमोल कवडे यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी.*   *बार्डीसह करकंब पंचक्रोशीतून अभिनंदनाचा होतोय वर्षाव....!*

करकंब/ प्रतिनिधी :

येथील अमोल सुभाष कवडे यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्राप्त झाली.त्यांनी ''मराठी आणि गुजराती दलित कथांचा तुलनात्मक अभ्यास'' या विषयावर मुंबई विद्यापीठास शोधनिबंध सादर केला होता, मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख डॉ.वंदना महाजन यांनी मार्गदर्शन केले. कवडे हे मूळचे बार्डी या गावचे असून ते  किसन वीर महाविद्यालय, वाई. येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण बार्डी या गावी तर, माध्यमिक शिक्षण करकंब, पदवीपर्यंतचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी झाले.पदव्युत्तर शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय , पुणे या ठिकाणी झाले आहे. शिवाय,त्यांनी एम.ए.इतिहास, एम.ए. तत्वज्ञान,  एम,एड, या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच ते नेट आणि सेट या परीक्षा उत्तीर्ण असून  भारतीय भाषा संस्थान मार्फत त्यांनी गुजराती भाषेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल बार्डीसह करकंब सह पंचक्रोशीतून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.