करकंब येथे विरबॅक कंपनीच्या सी,एस,आर, फंडातून वॉटर प्लॅंटचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न....!* *करकंब ग्रामपंचायत आणि भजलिंग महाराज मठाच अनमोल योगदान.*
करकंब प्रतिनिधी :
- करकंब येथे विरबॅक कंपनीच्या सी.एस.आर.फंडातून करकंब येथे करकंब ग्रामपंचायत आणि सद्गुरू भजलिंग महाराज मठाच्या अनमोल योगदानातून थंडगार पिण्याच्या पाण्याचा वॉटर प्लॅंटचा शुभारंभ थाटात संपन्न झाला.
विरबॅक कंपनी ही फ्रान्स मधील असून यांच्या शाखा १०३ देशात असून जनावरांच्या औषधांची निर्मिती करत असुन भारतातील नामवंत कंपन्यांपैकी एक असून या कंपनीच्या सी.एस.आर.फंडाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात ही एक जबाबदारी म्हणून शाळांसाठी अद्यावत शौचालय,वॉटर प्लॅंट, आदिवासी भागातील शाळांना बेंच,किचन शेड,आदी स्वरूपात यशस्वी काम केली जात आहेत.याच सामाजिक बांधिलकीतून करकंब येथे वाॅटर प्लॅन्टची निर्मिती केली आणि करकंब करांसाठी थंड आणि शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय ५रुपयात १५लीटर पाण्याची सोय झाली,
सुरुवातीला सरपंच प्रतिनिधी- एड.शरदचंद्र पांढरे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच -आदिनाथ देशमुख, सद्गुरू भजलिंग महाराज मठाचे अध्यक्ष- बाळासाहेब उर्फ प्रभाकर वास्ते, विरबॅक कंपनीचे एरिया बिझनेस मॅनेजर -जगदीश पाटील, डॉ.हणमंत भाळे, डॉ जहाँगिर मणेरी, डॉ.नितीन धायगुडे.सत्यवान जाधव, गणेश आळंदे, करकंब गावचे बिझनेस ऑफिसर -नंदलाल कपडेकर,ग्रामसेवक डॉ.सतिश चव्हाण, प्रा.-सतिश देशमुख, युवा नेते- विवेक शिंगटे, अजित सिंह देशमुख,राजाभाऊ देशमुख, रघूनाथ जाधव, डॉ.संजय वणवे, मा. ग्रामपंचायत सदस्य-राहुल शिंगटे, सचिन शिंदे, पत्रकार -गोपीनाथ देशमुख, या मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थितीत आर.ओ.प्लॅन्टच फीत कापून नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
प्रास्ताविक- नंदलाल कपडेकर यांनी करुन एरिया बिझनेस मॅनेजर - जगदीश पाटील यांनी विरबॅक कंपनी विषयी माहिती देऊन शेतकरी- राजा मुळे आमची कंपनी नावाजली असून त्यांच्या मुलांना मुलभूत सोयी म्हणून अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम कंपनीच्या वतीने राबविण्यात येत आहेत,त्याला सर्वांचा पाठींबा मिळत आहे,असे सांगून प्रा-सतिश देशमुख यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम कंपनीच्या माध्यमातून करकंब मध्ये झाला.असे उपक्रम राबवण्यासाठी अनेकांनी पुढे येण्याचं आवाहन ही केले,त्यानंतर सरपंच प्रतिनिधी एड-शरदचंद्र पांढरे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच -आदिनाथ देशमुख यांनीही मनोगतातून अशा उपक्रमांना करकंबकरांचा खुप मोठा फायदा होणार असून लोकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे,अशा सर्व उपक्रमांना निश्चित आमचं कायम सहकार्य राहील असं सांगितले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले,आभार- हरिश्चंद्र वास्ते यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत नामदेव शिंपी समाजातील तरुण कार्यकर्ते आणि करकंब गावच्या लेकीचं झाड, अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीमचे गणेश पिसे,प्रमोद रेडे,विजय शिंगटे,बापू खारे, देविदास काटवटे, चेतन पुरवत, शशिकांत पाटील, आदींनी अधिक परिश्रम घेतले.या स्तुत्य उपक्रमाचे करकंब ग्रामस्थांनी कौतुक करुन नंदलाल कपडेकर यांचे सर्वांनी अभिनंदन केले.