*करकंब येथे चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट यांच्या वतीने भावई उत्सव उत्साहात साजरा....!*
करकंब /प्रतिनिधी
:-अनेक वर्षांची परंपरा असलेला करकंब कोष्टी समाजाच्या वतीने साजरा होत असलेला श्री चौंडेश्वरी मंदिर भावई उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
पहिल्या दिवशी सुहासिनी पूजन आणि भोजन विजय भागवत यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते जवळपास ५००सुहासिनींनी आणि समाजबांधवांनी यांचा लाभ घेतला,आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ११:३० अनेक वर्षांपासून परंपरा असलेला आणि करकंब करांचा उत्सुकता असलेला भावई उत्सवाला सुरुवात झाली,जेष्ठ आमावशेला ही मिरवणूक चौंडेश्वरी मंदिरातून निघून सोमवार पेठ,आतार चौक, म्हसोबा, शुक्रवार पेठ,या मार्गावरून शेवटी दिलीप परीट यांच्या घरी पूजन करुन मंदिरात आई चौंडेश्वरी विसावते आणि या उत्सवाची सांगता होते,या उत्सवात अनेक कोष्टी समाजातील युवक महिला सहभागी होऊन एकीचं दर्शन घडवतात, याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ही मंदिराच्या वतीने साजरे होत असतात, चौंडेश्वरी कोष्टी समाज ट्रस्ट चे अध्यक्ष मिलिंद उकरंडे,सचिव विजय भागवत ट्रस्टी, यांच्या मार्गदर्शनाखाली समाजबांध एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणात उत्सव साजरा करतात.