कृषी विभागाचा रब्बी हंगामातील पुरस्कारात भोसे येथील ॲड.गणेश पाटील यांना दुसरा क्रमांक 

कृषी विभागाचा रब्बी हंगामातील पुरस्कारात भोसे येथील ॲड.गणेश पाटील यांना दुसरा क्रमांक 

पंढरपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत सन 2020-21 मध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटावे म्हणून शासनातर्फे रब्बी हंगाम पीक  स्पर्धा राज्य ,जिल्हा, तालुका स्तरावर घेण्यात आली यामध्ये तालुका स्तर या घटकामध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे ( क ) येथील शेतकरी ॲड गणेश दादा पाटील यांनी हरभरा पिकामध्ये 18.75 क्विंटल एवढे उत्पादन घेऊन  दुसरा क्रमांक मिळवला. त्याबद्दल पंचायत समिती पंढरपूर येथे कृषी विभागामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी तळेकर व तालुका कृषी अधिकारी पवार  यांचे हस्ते ॲड गणेशदादा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती अर्चना व्हरगर ,गट विकास अधिकारी रविकिरण घोडके तसेच कृषी विभागातील अधिकारी पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड गणेशदादा पाटील यांनी कृषी सहाय्यक धनराज खोत यांचे मार्गदर्शनाखाली जॕकी ९२१८ या सुधारीत जातीच्या वाणाची पेरणी करून हेक्टरी  १८.७५ क्विंटल उत्पादन घेतले
पेरणी करण्यापूर्वी या सुधारीत वाणाची चाचणी घेवून ८०% उगवण क्षमता असल्याची खात्री करूनच त्या सुधारीत जातीच्या वाणाची पेरणी केली.
पेरणी करत असतानाच १०२६२६ या खताचा डोस देण्यात आला.नंतर किडीचा प्रसार रोखण्यासाठी कामगंध सापळे लावण्यात आले.यामुळे किड रोखली जावून उत्पादन वाढण्यास मदत झाली.अशी माहिती ॲड.पाटील यांनी दिली.
शासनाच्या या पुरस्कारामुळे ॲड गणेशदादा पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.