*सोलापूर आर टी ओ  कार्यालयाकडून   प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवर विशेष तपासणी मोहीमेअंतर्गत धडक कारवाई*  - *214तपासणी केलेल्या  मधून 94खाजगी बसेसवर दंडात्मक कारवाई* 

*सोलापूर आर टी ओ  कार्यालयाकडून   प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवर विशेष तपासणी मोहीमेअंतर्गत धडक कारवाई*  -     *214तपासणी केलेल्या  मधून 94खाजगी बसेसवर दंडात्मक कारवाई* 

पंढरपूर/प्रतिनीधी

 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , सोलापूर कार्यालयाकडून जिल्ह्यातील रस्ते अपघात टाळणे तथा कमी करणे व अपघातातील मनुष्यहानी व वित्त हानी टाळणे तथा कमीत कमी कशी होईल यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून  कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहिम आयोजित करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस संवर्गातील वाहनांची अचानकपणे तपासणी केली.  
या मोहीमे अंतर्गत  पुणे महामार्गावरील सावळेश्‍वर टोल नाका, बार्शी बायपास, इंचगाव टोल नाका मंगळवेढा रोड , याठिकाणी शनिवारी, दिनांक- 08/07/2023, रोजी  रात्री  214  खासगी ट्रँव्हल्स बसेसची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करीत प्रवाशांची वाहतूक करणार्‍या 94 बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच यावेळी अधिकार्‍यांकडून प्रवासी, वाहक-चालक यांना रस्ता सुरक्षा, अपघात झाल्यास घ्यावयाची खबरदारी, आपत्कालीन व्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सोलापूर शहर व जिल्ह्यातूनदेखील पुणे ते हैद्राबाद, सोलापूर ते विजयपूर ते चित्रदुर्ग, नागपूर ते रत्नागिरी हे महत्वाचे महामार्ग जातात. या महामार्गावरून दररोज रात्री मोठ्या प्रमाणात खासगी ट्रँव्हल्स बसमधून दररोज हजारो प्रवासी हे प्रवास करीत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरटीओ कार्यालयाच्यावतीने शनिवारी रात्री अचानकपणे या खासगी ट्रँव्हल्स बसेसची तपासणी मोहिम राबविण्यात आली. आरटीओ कार्यालयाच्या तीन वेगवेगळ्या पथकांमार्फत पुणे महामार्गावरील सावळेश्‍वर टोल नाका, बार्शी आणि मंगळवेढा टोल नाका याठिकाणी ही तपासणी मोहिम राबविण्यात आली.
या तपासणी मोहिमेत ट्रँव्हल्स बसमधील आपत्कालीन दरवाजा, योग्यता प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे, वाहनातील अग्‍निशामक यंत्रणा, स्पीड गर्व्हनर, लाईटस्-इंडिकेटर्स-स्टॉप-बॅकलाईट-रिफ्लेक्टर-हॉर्न, चालकाचा परवाना आदींची तपासणी करण्यात आली. 
सावळेश्‍वर टोल नाका येथे 100 बसेसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 32 वाहनांना ई चलन जारी करण्यात आले आहे. बार्शी येथे 90 बसेसची तपासणी करण्यात आली असून 38 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मंगळवेढा टोल नाका येथे 24 बसेसची तपासणी करण्यात आली असून 24 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सदर मोहीम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या आदेशाने, तसेच साहाय्यक प्रादेशिक परिवहन आधिकरी अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली केली
या मोहिमेमध्ये, मोहीम यशस्वी होण्यासाठी  मोटार वाहन निरीक्षक शिरीष पवार, शीतलकुमार कुंभार, राहुल खंदारे, किरण गोंधळे, शिरीष तांदळे, अविनाश अंभोरे तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल घुले, बाबू तेली, तेजस मखरे, तेजस्विनी वायचळ, ऐश्वर्या धललु, बाळासाहेब सलगर, अजित कदम यांनी तर मोटार वाहन चालक नामदेव व्हनमराठे,  प्रमोद महाडिक, राकेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
“खासगी ट्रँव्हल्स बसेसच्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही तपासणी मोहिम राबविण्यात आलेली आहे. या मोहिमेत दोषी आढलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण 3,32,700/- इतका दंड आकारण्यात आला असून  ज्या वाहनांमध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे, त्या वाहनांना नियमांप्रमाणे वाहतूक करण्याच्या सक्‍त सूचना देण्यात आल्या आहेत”. अशी माहिती श्रीमती अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर, यांनी दिली.