*साहित्यिक आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पोलीस आणि पदाधिकारी बैठक* *पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो. नि. मिलिंद पाटील यांनी जयंती शांततेत पार पाडण्याचे केले आवाहन*

*साहित्यिक आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पोलीस आणि पदाधिकारी बैठक*  *पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो. नि. मिलिंद पाटील यांनी जयंती शांततेत पार पाडण्याचे केले आवाहन*

पंढरपूर/प्रतिनीधी

विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या आगामी जयंती उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दि 27ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यासमवेत बैठक पार पडली. यावेळी ही जयंती शांततेत पार पाडण्याचे  आवाहन पो. नि मिलिंद पाटील यांनी केले.

या  बैठकीत विविध विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.         दिनांक 1 ऑगस्ट ते 31           ऑगस्ट  या कालावधीमध्ये विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी जगभरामध्ये साजरी केली जाते  ,           या जयंती उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यामधील विविध संघटना व विविध जयंती उत्सव मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज पंढरपूर येथील तालुका पोलीस स्टेशन येथे  पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . यावेळी पाटील यांनी विविध कायदेशीर विषयावर सखोल मार्गदर्शन केले व जयंती उत्सव सर्व नियमांचे पालन करून आदर्शवंत जयंती उत्सव  साजरा करण्याचे आवाहन सर्वानां केले .
     या बैठकीसाठी  लहुजी शक्ती सेनेचे विविध पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते  यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव मा देविदास कसबे व समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा तानाजी रणदिवे यांनी हे आपले विविध विषयावर मनोगत व्यक्त केले .यावेळी लहुजी शक्ती सेनेचे तालुकाप्रमुख मुकुंद घाडगे, तानाजी वाघमारे, समाधान वायदंडे,अनिल पाटोळे, रघुनाथ पाटोळे, राजेंद्र रणदिवे ,विठ्ठल रणदिवे, अभिषेक लोंढे तालुक्यातील तपकिरी शेटफळ ,बोहाळी ,रोपळे नारायण चिंचोली, तुंगत ,सुस्ते ,तारापूर बिटरगाव ,अजूनसोंड देगाव ,शेगाव,कोर्टी रोपळे ,खर्डी ,ओझेवाडी अन्य विविध गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस कॉन्स्टेबल अमोल गावडे साहेब यांनी मानले.