*तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत वसंतराव काळे प्रशालेस दुहेरी मुकुट*

*तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत वसंतराव काळे प्रशालेस दुहेरी मुकुट*

पंढरपूर/प्रतिनीधी 
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या मान्यतेन शेवते ता. पंढरपूर येथे झालेल्या पंढरपूर तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत वसंतराव काळे प्रशाला वाडीकरोलीच्या मुलींच्या संघाने दुहेरी यश मिळवत दुहेरी मुकुट संपादन केला.
 या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात  अंतिम सामन्यात तुगेश्वर विद्यालय तुंगचा एक डाव सात गुणांनी पराभव केला व प्रथम क्रमांक मिळवला तर 17 वर्षे मुलींच्या गटातही तुंगेश्वर विद्यालय तुंगतचा 01 डाव 9 गुणांनी पराभव  करूनप्रथम क्रमांक मिळवला या दोन्ही संघाची  सोलापूर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी  निवड झाली आहे.
 गेले सहा वर्षापासून वसंतराव काळे प्रशालेतील खो-खो चा संघ हा पंढरपूर तालुक्यातून शालेय स्पर्धेत  विजयी होत पुणे विभागाचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करीत आहे .आपल्या उज्वल यशाची परंपरा याही वर्षी खेळाडूंनी कायम ठेवत यश संपादन केले  आहे .या सर्व यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षक अतुल जाधव सहकारी गौतम लामकाने यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्याण काळे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी प्रशालेचे प्राचार्य दादासो खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे यांनी अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
*चौकट -*
गेली सहा वर्ष वसंतराव काळे प्रशालेचा खो -खो संघ पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत राज्यस्तरावर यश मिळवत आहे. पंढरपूर तालुक्यतील ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्याने या प्रशालेतील खेळाडूंनी महाराष्ट्राच्या खो-खो संघातून खेळताना राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके प्राप्त केले आहेत भारत देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कार या प्रशालेतील विद्यार्थिनींनी मिळविला आहे.

*फोटो ओळ*- यशस्वी खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी उपस्थित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे मा. प्रा.बागल सर युवा गर्जनाचे संस्थापक समाधान काळे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी मुख्याध्यापक दादासो खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे प्रशिक्षक अतुल जाधव व खेळाडू.