*उंबरे पागे शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी गणेश सलगर तर उपाध्यक्ष पदी विजय शिवपालक* 

*उंबरे पागे शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी गणेश सलगर तर उपाध्यक्ष पदी विजय शिवपालक* 

                           पंढरपूर/प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे तालुका  जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा उंबरे या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश सलगर  तर उपाध्यक्षपदी विजय शिवपालक यांची निवड करण्यात आली.

सदरची निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली यामधे वरील निवड बिनविरोध करण्यात आली.
यासाठी धनाजी शिवपालक उपविभागीय दक्षता व नियंत्रण  समिती सदस्य व अमर इंगळे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा तालुकाध्यक्ष उमेश गायकवाड ,परशुराम आदटराव, नागनाथ तुकाराम कदम, सुनील जाधव ,अमोल जोशी, लक्ष्मण गायकवाड ,दिगंबर मुळे, कपूर मुलानी ,हनुमंत भोसले ,दत्ता गुजर, पांडुरंग जनार्दन सलगर, राजू गायकवाड आदींनी सर्वांनी पुढाकार घेऊन कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता शाळेच्या विकास विद्यार्थ्याच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वांनी एक मताने बिनविरोध अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली.
     यावेळी उंबरे केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख जाधव सर व करोळे कानपुरी जळवली सांगवी सर्व गाव व वस्तीशाळा या शाळेचे मुख्याध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून मीनल परमेश्वर लोंढे तर महिला सदस्य काजल सुरज शेख, उर्मिला दत्तात्रय गुजर ,करिष्मा लक्ष्मण गायकवाड, पायल अमोल जोशी, उर्मिला दत्तात्रेय गुजर ,अश्विनी संतोष डरंगे, डॉक्टर प्रतिनिधी म्हणून   डॉ सागर दगडे ,शिक्षण प्रेमी म्हणून धनाजी ढोबळे व उमेश गायकवाड. शिक्षक प्रतिनिधी सिद्धेश्वर खंडू हुकीरे, तर सचिव म्हणून मुख्याध्यापक भारत रामा बंडगर यांची निवड करण्यात आली.