*माढा तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी जाहीर*

*माढा तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी जाहीर*

पंढरपुर : प्रतिनिध

राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के , जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माढा तालुकामधील प्रहार संघटनेचे विविध विभागातील पदाधिकारी निवडी तालुक्यातील वाकाव येथे जाहीर करण्यात आल्या . 
अध्यक्ष अमोल केसरे , तालुका कार्याध्यक्ष संतोष कवले यांच्या नेतृत्वाखाली    माढा तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटनेची पदाधिकारी निवडीची  बैठक  पार पडली.त्या प्रसंगी माढा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते यांनी प्रहार शेतकरी संघटनेत प्रवेश केला यावेळी त्यांच्या पदाधिकारी नेमणुका पार पडल्या. त्यात प्रामुख्याने तांदुळवाडी चे माजी उपसरपंच राजाभाऊ शिंदे यांची प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख पदी,  माणेगाव चे युवा नेते भास्कर कदम यांची तालुका उपाध्यक्ष पदी, तर माणिक जगताप यांची तालुका संघटक, बापू वागज यांची तालुका सहसचिव पदीनिवड करण्यात आली.
     सुयोग कदम यांची युवा तालुका संपर्क प्रमुख तर, मुस्तफा छोटे मिया काझी यांची तालुका युवक सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
 मालोजी चव्हाण , श्रीकृष्ण डूचाळ यांची युवक तालुका उपाध्यक्ष , विशाल कदम यांची युवक तालुका संघटक पदी, भूषण चव्हाण यांची माने गाव विभाग प्रमुख, प्रवीण लोकरे पाटील यांची विद्यार्थी तालुका अध्यक्ष, उत्कर्ष चव्हाण यांची विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष पदी, निवड करण्यात आली. पदाधिकारी यांना निवडपत्र अमोल केसरे यांच्या सहिने जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के , जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, यांच्या हस्ते देण्यात आले.
 त्याप्रसंगी संघटनेत अनेक कार्यकर्ते यांनी संघटनेत प्रवेश  केला. त्याप्रसंगी हरी भुसारे, विश्वजित पाटील, अमोल तांबिले, दादासाहेब तांबिले,  माणिक भुसारे, साळुंके, जमीर शेख, लहू कोळी, संतोष उंदरे,असे अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.