*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वोच्च अशा मनसे नेते पदी दिलीपबापू धोत्रे यांची निवड*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वोच्च अशा मनसे नेते पदी दिलीपबापू धोत्रे यांची निवड*

पंढरपूर, :-प्रतिनिधी

, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्वोच्च अशा मनसे नेतेपदी  निवड केली,मुंबई येथील कृष्णकुंज निवस्थानी राज ठाकरे यांनी दिलीपबापू धोत्रे याना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या,,
सन1992 ,,93  साली सर्वप्रथम पंढरपूर महाविद्यालया च्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या शाखा अध्यक्ष पदी दिलिप धोत्रे यांची निवड करण्यात आली होती त्यावेळेपासून आजतागायत दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत, त्याचे फळ त्यांना मिळाले,,
सलग 29 वर्ष धोत्रे हे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, कॉलेज चे शाखा अध्यक्ष ते मनसेचे नेते असा त्यांचा राजकीय प्रवास आहे,,
कॉलेज अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपतालुक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संघटक, प्रदेश सरचिटणीस, मनसे नेते असा त्यांचा प्रवास आहे,,
सलग 2 वर्ष आलेल्या महाभयंकर आशा कोरोनाच्या संकटात दिलिप धोत्रे यांनी हजारो कुटुंबाना मदत केली आहे,,
राज साहेब ठाकरे यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती प्रामाणिक पणे पार पाडेन ,सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन,, एकनिष्टतेचे हे फळ आहे असे धोत्रे म्हणाले,, मनसे नेते पदी निवड झाल्याने धोत्रे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे,,