*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर च्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात*

करकब/प्रतिनिधी
कोकण मधील चिपळूण येथे महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आहेत महापुर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी चिखल गाळ आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे, यासाठी नेहमीच वेगवेगळ्या आपत्तींच्या वेळेस आणि कोणाच्या महामारी प्रशासनाच्या मदतीला कार्यतत्पर असणारी पंढरपूरची राष्ट्रवादी विध्यर्थी काँग्रेस ची 25 युवकांची टीम, राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम, प्रदेश संघटक मुबीन मुल्ला, जिल्हा अध्यक्ष राहुल कवडे, तालुकाध्यक्ष प्रणव गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेश बोचरे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण येथे 7 दिवसापासून शहरातील स्वछता असेल, किटकनाशक फवारणी, असेल पावडर टाकने, असे अनेक महत्वपूर्ण ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर ची टिम मदतकार्य करत आहे .
यावेळी चिपळूण विधानसभेचे आमदार शेखर निकम यांनी महेश बोचरे आणि त्यांच्या टिम ची भेट घेऊन कार्याच कौतुक केलं.