*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे विशेष गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके व साहित्यांचे वाटप*

*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे विशेष गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके व साहित्यांचे वाटप*

 करकंब/ प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील करकब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल प्रशालेत आज 17 सप्टेंबर रोजी शिक्षण विभाग सोलापूर यांच्या वतीने सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अपंग समावेशित शिक्षा विभागामार्फत प्रशालेतील विशेष गरजू विद्यार्थ्यांना विशेष लिपीतील पुस्तके व साहित्याचे वाटप करण्यात आले.
 यावेळी प्रशालेचे पर्यावेक्षक धनवंत करळे नरसिंग एबोते, विनय कुलकर्णी, नागेश घुले, अभिषेक चोपडे सुरेश दहिगिरे संजय पाटील शकूर बागवान रमेश कविटकर पालक व विद्यार्थी उपस्थित होते.