*शिवशक्ती नवरात्र उत्सव तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश गोडसे यांची निवड*

करकंब /प्रतिनिधी
शंकरनगर करकंब येथील शिवशक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश बाबू गोडसे यांची निवड करण्यात आली आहे. शिवशक्ती नवरात्र उत्सव तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश गोडसे यांची निवड.
यावेळी या नवरात्र उत्सव मंडळाचे महेंद्र लोंढे महादेव गायकवाड जयवंत व्यवहारे मोहन मुजमुले सुनील लोंढे सुभाष परदेशी माऊली नाईक नवरे आदीसह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोरोना नियमाचे पालन करून सामाजिक प्रबोधन व लसीकरणावर भर देऊन आरोग्यविषयक उपक्रम राबविणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.