*स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्ताने अक्षय वाडकर मित्रपरिवाराच्या वतीने भरगच्च कार्यक्रम* *पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांसाठी अक्षय वाडकर यांच्याकडून सेवा सप्ताह*

पंढरपूर:-प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते,सहकार श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त पंढरीतील प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांसाठी सेवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अक्षय वाडकर यांनी दिली आहे.
    या जयंतीनिमित्त येथील अक्षय वाडकर मित्र परिवाराच्या वतीने जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली  आठवडाभर विविध सेवा देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 
   या कार्यक्रमामध्ये मंगळवार दिनांक12 ऑक्टोबर रोजी सकाळी।10ते 4या वेळेत संत तुकाराम भवन शेजारी पश्चिम द्वार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी10वाजता प्रभाग6 येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.


    गुरुवार दि14 ऑक्टोबर रोजी सकाळी10ते2या वेळेत बडवे गल्ली पश्चिम द्वार येते रक्त तपासणी, ब्लडप्रेशर,थायराईड,मधुमेह आदी आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
     शनिवारी  16 ऑक्टोबर रोजी सकाळी10ते2या वेळेत छत्रपती संभाजी चौक येथील दामाजी पंत मठामध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू, शस्त्रक्रिया (लेन्सेसहित) मोफत करून देण्यात येणार आहे.
    रविवार दि 17 रोजी महिलांसाठी  विजापूर गल्ली येथील पांडुरंग भवन येथे भव्य सुपंत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
     सोमवारी18 रोजी जुनी माळी गल्ली येथील एकनाथ भवन मध्ये सकाळी10ते4 या वेळेत भव्य मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.
 20 ऑक्टोबर रोजी सकाळी10ते4वाजेपर्यत 
 उमदे गल्ली येथील संत वामनभाऊ महाराज  मठ येथे  मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  वरील सर्व सेवा सप्ताह मधील सेवेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन अक्षय वाडकर यांनी केले आहे.