*राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांच्या वतीने नव रात्री नवदुर्गा चा उपक्रम*. *करकंब पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी व महिला होमगार्ड यांचा सत्कार व सन्मान*

करकंब /प्रतिनिधी:
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी (ओबीसी) यांच्या वतीने करकंब पोलीस ठाणे येथील महिला पोलीस कर्मचारी व महिला होमगार्ड यांचा नवरात्र नवरात्रि चे औचित्य साधून या सर्व नवदुर्गा चा सत्कार व सन्मान करकंब पोलीस ठाण्यात करण्यात आला. या सर्व महिला पोलीस कर्मचारी व महिला होमगार्ड हे कोरणा काळ तसेच नवरात्र बंदोबस्त व इतर बंदोबस्तासाठी सक्षम पणे नवदुर्गा बनून म्हणून सामान्य जनांचे संरक्षण करतात म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी (ओबीसी) च्या जिल्हा उपाध्यक्षा-सविता संजय नवगिरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, साहाय्यक फौजदार शशिकांत कविटकर, पोलीस नाईक उमेश जाडकर, महिला पोलीस कर्मचारी, महिला होमगार्ड, पंढरपूर तालुका अध्यक्ष माया खारे, जळवली चे सरपंच ज्योतीराम मदने, माजी तंटामुक्त अध्यक्ष, व्हॉइस चेअरमन बलभीम पाटील, दत्ताभाऊ भायगुडे सुगंधा भायगुडे आदिंसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.