*करकंब येथे लसीकरण जनजागृती ला आला वेग...*!  *आज 119 जनाचे झाले लसीकरण*. *आरोग्य विभाग व युवाशक्तीचा संयुक्त उपक्रम*.

*करकंब येथे लसीकरण जनजागृती ला आला वेग...*!  *आज 119 जनाचे झाले लसीकरण*. *आरोग्य विभाग व युवाशक्तीचा संयुक्त उपक्रम*.


  करकंब /प्रतिनिधी

करकंब येथे सध्या आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहिम सुरू असून या उपक्रमामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक जण लसीकरणाबाबत जनजागृती करून गावात ठिक ठिकाणी व वाड्या वस्त्यावर लसीकरणाचे कॅम्प सुरू करून लसीकरण करण्यात येत असल्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
   आज करकंब येथील वार्ड क्रमांक चार युवाशक्ती समूहातर्फे रोहिदास नगर समाज मंदिरात लसीकरणाचा कॅम्प व लसीकरण मोहीम जनजागृती बाबत उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 65 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी युवाशक्ती समूहाचे अध्यक्ष , माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, अतुल अभंगराव सर, अशिष नागरस,आनंद देशमुख आरोग्य सेवक बीएस लादे, विशाल देशमुख विनायक राजगुरू किशोर टेके, आरोग्य विभागाचे खरात मॅडम मुखरे मीरा जाधव माळी चव्हाण व अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. जानकर वस्ती येथेही लसीकरण उपक्रमाचे व जनजागृती चे आयोजन केले यावेळी 54 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. एकूण आज दुपारपर्यंत 119 जणांनी सहभाग नोंदविला.